Mumbai Crime : लंडनहून पार्टीकरिता आलेल्या व्यक्तीला बाऊन्सरकडून मारहाण; क्लबमध्ये नेमकं काय घडलं ?

119
Kalyan News : मोहन्यातील टोपी वाद प्रकरणाला कलाटणी; गर्भवतीच्या पोटात मारली लाथ अन्...
  • प्रतिनिधी 

लंडन येथे राहणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीला आणि त्याच्या मित्राला मुंबई वांद्रे येथील ‘145 क्लब’ मधील दोन बाऊन्सर यांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी ‘145 क्लब’ च्या दोन बाऊन्सर यांच्या विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime)

रवी तीलवाणी (३०) असे मारहाण करण्यात आलेल्या तक्रारदाराचे नाव आहे. मुलुंड पश्चिम स्वप्ननगरी येथे राहणारे रवी तीलवाणी हे लंडन येथे नोकरी करतात आणि तिथेच राहण्यास आहे. मागील काही दिवसांपूर्वी रवी तीलवाणी मुंबईत आले होते, रविवारी रात्री तीलवाणी आपल्या दोन मित्रासह वांद्रे पश्चिम येथील ‘145 क्लब’ येथे पार्टी करण्यासाठी गेले होते. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Bharat Mandapam : दिल्लीत भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन)

क्लबमध्ये डान्स करीत असताना क्लबचे दोन बाऊन्सर रवी जवळ आले आणि कुठलेही कारण नसताना त्याला मारहाण करू लागले, तीलवाणी यांनी त्यांना मारहाणीचा जाब विचारला असता दुसऱ्या बाऊन्सर ने पायतील बुटाने कपाळावर लाथ मारली, त्यात तीलवाणी यांच्या कपाळाला जखम झाली. एवढ्यावर न थांबता एका बाऊन्सरने रवी तीलवाणी यांचे केस पकडून जिन्यावरून ओढत क्लबच्या बाहेर कडून रस्त्यावर लोटून दिले, रवी तीलवाणी सोबत असलेल्या मित्राने मारहाणीचा जाब विचारला असता बाऊन्सर यांनी त्यांच्या कानशिलात लगावून दिली. (Mumbai Crime)

रवी तीलवाणीने मदतीसाठी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल केला, घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी जखमी तीलवाणीला भाभा रुग्णालय येथे उपचारासाठी आणले, वांद्रे पोलिसांनी तीलवाणी याच्या तक्रारीवरून ‘145 क्लब’च्या दोन बाऊन्सर विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.