चिमुरड्याने खोबरं खाल्लं म्हणून आईला बेदम मारहाण; Viral video चा समाज माध्यमांवर धुमाकूळ

सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे त्यात एका पुरूषानेही या महिलेच्या अंगावर हात टाकल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

300
चिमुरड्याने खोबरं खाल्लं म्हणून आईला बेदम मारहाण; Viral video चा समाज माध्यमांवर धुमाकूळ
चिमुरड्याने खोबरं खाल्लं म्हणून आईला बेदम मारहाण; Viral video चा समाज माध्यमांवर धुमाकूळ
  • कल्याण : प्रतिनिधी

Viral video : डोंबिवलीला जोडून असलेल्या पिसवली गावात शनिवारी सायंकाळच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ८ वर्षाच्या मुलाने रस्त्यावर सुकण्यासाठी ठेवलेले खोबरे उचलले. त्यामुळे त्याच्या आईला हकनाक मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांमध्ये महिला आघाडीवर होत्या. तथापी सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे त्यात एका पुरूषानेही या महिलेच्या अंगावर हात टाकल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मारहाणीचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून समाज माध्यमांवर अनेकांनी संताप व्यक्त केली आहे. ज्या मुलाने खोबरे उचलले होते तो मुलगा गतीमंद असल्याचेही समोर आले आहे. (Viral video)

(हेही वाचा – Ulhas River च्या प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना नाहीत; आंदोलन होऊन वर्ष उलटले तरी कृती आराखडा नाहीच)

 

कल्याण-शिळ महामार्गावर (Kalyan-Shil Highway) असलेल्या पिसवली गावातील एका चाळीमध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबात शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास किरकोळ करणावरून वाद झाला. एका लहान मुलाने वाळत टाकलेले खोबरे खाण्यासाठी उचलल्याचे निमित्त झाले. हे पाहून तिथे असलेल्या काहा महिलांनी त्या मुलाच्या आईला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यात एका पुरूषाने ही त्या मुलाच्या आईला मारहाण केली. एकच वेळी अनेक जण त्या महिलेवर तुटून पडले. हे सर्व घडत असताना तिथे असलेल्या एकाने या घटनेचा व्हिडीओ करून तो समाज माध्यमांवर व्हायरल केला केला. या व्हिडीओमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी सुरू असल्याचे दिसत आहे. काही लोक या दोघींचा वाद सोडवण्याचे प्रयत्न करत आहेत. तर काही जण एका महिलेला मारहाण करत आहेत. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला. हे प्रकरण मानपाडा पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तेथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Viral video)

अदखलपात्र गुन्ह्याच्या नोंदीने बोळवण

अतिशय शुल्लक कारणावरून टोकाचा वाद झाला. त्यात खोबरे खाण्यासाठी गेलेला मुलगा गतीमंद आहे. याचाही मारहाण करणाऱ्यांना काही फरक पडला नाही. महिला तर त्याच्या आईला मारतच होत्या. पण एक पुरूषीही त्या महिलेला मारहाण करत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. पोलीसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत तक्रारदार महिलेची बोळवण केली. त्यामुळे महिलेने न्यायासाठी जायचे कुणाकडे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर समाज माध्यमांवर तिव्र प्रतिक्रीया उमटत आहे. शिवाय पोलीसांच्या कार्यपद्धती बाबतही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (Viral video)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.