Mahadev Betting App Case : रणबीर पाठोपाठ कपिल शर्मा सह तिघांना ईडीचे समन्स 

98
Mahadev Betting App Case : रणबीर पाठोपाठ कपिल शर्मा सह तिघांना ईडीचे समन्स 
Mahadev Betting App Case : रणबीर पाठोपाठ कपिल शर्मा सह तिघांना ईडीचे समन्स 
महादेव ऑनलाइन बेटिंग अँप प्रकरणात ईडीने दाखल करण्यात आलेल्या मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ईडीने रणबीर कपूर पाठोपाठ गुरुवारी (०५ ऑक्टोबर) कपिल शर्मा, हिना खान आणि हुमा कुरेशी यांना समन्स बजावले आहे. रणबीर कपूर याला ईडीने शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्याने वकीलामार्फत ईडीकडून दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला असल्याचे समजते. महादेव ऑनलाइन बेटिंग अँप प्रकरणात ईडीच्या रडारवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी असल्याची माहिती समोर येत असून लवकरच त्यांना देखील ईडीकडून समन्स बजावले जाऊ शकतात अशी शक्यता ईडीच्या सूत्रांकडून वर्तवली जात आहे. (Mahadev Betting App Case)
महादेव ऑनलाइन बेटिंग अँप प्रकरणात ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने याप्रकरणी बुधवारी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला ईडीने समन्स बजावून शुक्रवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. ईडीने रणबीर कपूरवर महादेव बेटिंग अँपची ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी पैसे मिळवल्याचा आरोप केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीने कपूर यांना ६ ऑक्टोबर रोजी ईडीच्या रायपूर कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते, मात्र रणबीरने आपल्या वकिलामार्फत ईडीकडे अर्ज करून त्याला दोन आठवड्यांचा वेळ देण्यात यावा असे म्हटले आहे. दरम्यान, ईडीने दाखल केलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात इतर १४ ते १५ बॉलिवूड सेलिब्रिटींचा सहभाग ईडीला आढळून आला असून या अनुषंगाने ईडीने गुरुवारी कॉमेडी किंग कपिल शर्मा सह हिना खान हुमा कुरेशी या तिघांना समन्स बजावले आहे. ईडीच्या रडारवर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी असून एकेक करून त्यांना देखील समन्स पाठवण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. (Mahadev Betting App Case)
ईडीच्या म्हणण्यानुसार, कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्रशेखर आणि रवी उप्पल हे अॅप दुबईतून चालवत होते. त्यांनी नवीन वापरकर्त्यांची नोंदणी करण्यासाठी, आयडी तयार करण्यासाठी आणि बहुस्तरीय बेनामी बँक खात्यांच्या नेटवर्कद्वारे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन बेटिंग अॅप्लिकेशन्सचा वापर केल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीच्या तपासात ‘महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप’ संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथील मुख्य कार्यालयातून चालवले जात असल्याचे समोर आले आहे. सट्टेबाजीतून कमावलेले पैसे इतर देशांतील खात्यांमध्ये पाठवण्यासाठी ‘हवाला’चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतात सट्टेबाजीच्या वेबसाइट्सना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वापरली गेली आहे. तसेच, बॉलिवूड सेलिब्रिटींना या अॅप्लिकेशनची जाहिरात करण्यासाठी मोठ्या रकमा रोखीने मिळाल्याचा आरोप आहे. (Mahadev Betting App Case)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.