Lpg Gas Theft : टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंग करून व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणारी टोळी गजाआड

व्यावसायिक सिलेंडरमध्ये 800 रुपयांमध्ये एक सिलेंडर याप्रमाणे गॅस भरून देत असल्याची टँकरचालकाची कबुली

96
Lpg Gas Theft : टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंग करून व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणारी टोळी गजाआड
Lpg Gas Theft : टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंग करून व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणारी टोळी गजाआड

थेट टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंग करून ते व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणाऱ्या टोळीविरोधात छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी कारवाई केली. धोकादायक पद्धतीने टँकरमधून गॅस भरणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण 52 लाख 68 हजार 883 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, जावेदखान मोहम्मद मुनाफ (वय 40 वर्षे, रा. डी-8, ममर्डा कॉलनी, कोकरीनगर, सायन, मुंबई), शेख अफसर शेख बाबुमियाँ, (वय 35 वर्षे, रा. राजेंद्रनगर, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर) व कदीर शेख अब्दुल रज्जाक (वय 35 वर्षे रा. गल्ली क्रमांक 23, इंदिरानगर, बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

लिंक रोड गोलवाडी शिवार येथे माऊली हॉटेलच्या बाजूला एचपी कंपनीच्या टँकरमधून गॅस सिलेंडरमध्ये चोरून भरले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगर पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. तसेच या पथकाने पाहणी केली असता लिंक रोडवर मोकळ्या जागेत एक एचपी कंपनीचा टँकर (MH -12-NX –733) दिसला. तसेच, टँकरच्या बाजूला एक मारुती सुझुकी कंपनीचा टेम्पो क्रमांक (MH-20-EL-0520) उभा होता. टेम्पोमध्ये व्यावसायिक वापराचे सिलेंडर ठेवलेले होते. यावेळी एलपीजीने भरलेल्या टँकरच्या पाईपला रबरी नळी लावून हा गॅस चोरून नोझलद्वारे व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरत असताना तीनही आरोपी सापडल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

(हेही वाचा – Jay Shriram : जय श्रीराम घोषणा दिल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण)

आरोपींना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी पुरवठा अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून घेतले. पुरवठा अधिकाऱ्यांनी तीनही संशयित आरोपींकडे विचारपूस केली. तसेच टँकरचालकाला विचारले असता त्याने सांगितले की, हा टँकर मुंबईतील गॅस कंपनीतून गॅस भरून चिकलठाणा येथे गॅस डेपोमध्ये जात आहे. आरोपी शेख अफसर शेख बाबू आणि कदीर शेख अब्दुल रज्जाक यांना टँकरमधून रिकाम्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये 800 रुपयांमध्ये एक सिलेंडर याप्रमाणे गॅस भरून देत असल्याची कबुली टँकरचालने दिली. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल
  • 40 लाख रुपये किमतीचा गॅस टँकर
  • 20.167 टन गॅस – 7 लाख 37 हजार 133 रुपये किंमत
  • 12 हजार 250 रुपये किंमतीचे अंदाजे 19 किलो वजनाच्या LPG गॅसने भरलेले 7 व्यवसायिक सिलेंडर
  • 14 हजार 500 रुपये किंमतीचे रिकामे 29 नग व्यवसायिक गॅस सिलेंडर
  • 5 हजार रुपये किमतीची रबरी नळी व नोझल
  • 5 लाख रुपये किमतीचा टेम्पो
  • एकूण 52 लाख 68 हजार 883 रुपये किमतीचा मुद्देमाल
कारवाईत सहभागी पोलीस

ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहीया, प्रभारी अधिकारी पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त, उस्मानपुरा विभाग, डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक देवीदास शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक भंडारे, पोलीस हवालदार सुनिल धुळे, पोलीस शिपाई दीपक शिंदे, पोलीस शिपाई सुनिल पवार, पोलीस शिपाई अजित लोंढे, पोलीस शिपाई अनिल राठोड, पोलीस शिपाई मुरमुरे, पोलीस शिपाई अभय भालेराव, चालक पोलीस नाईक राऊत यांनी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.