Lalit Patil : ड्रग्स माफिया ललित पाटीलला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई 

53
Lalit Patil : ड्रग्स माफिया ललित पाटीलला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई 
Lalit Patil : ड्रग्स माफिया ललित पाटीलला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई 
मुंबई पोलिसांच्या सकिनाका पोलिसानी मंगळवारी रात्री उशिरा ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला बंगळुरु मधून अटक केली आहे. सकिनाका पोलिसांचे पथक ललित पाटील याला घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे. ड्रग्ज तस्कर ललित पाटील गेल्या दोन आठवड्यांपूर्वी  पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
पाटील यांच्यावर पोलीस बंदोबस्तात ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. सकिनाका पोलिसांनी नाशिक येथे एमडीचा कारखान उध्वस्त केला होता, हा कारखाना ललित पाटील यांचा भाऊ चालवत होता, याकारवाई नंतर सकिनाका पोलिसांना ललित (Lalit Patil) च्या ठावठिकाण्याचा सुगावा लागला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सकिनाका पोलीस1 ललित पाटीलच्या मागावर असताना तो बंगळुरू मध्ये लपून बसला असल्याची माहिती सकिनाका पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यासाठी एक पथक बंगळुरू येथे रवाना करण्यात आले होते. मंगळवारी रात्री त्याला बंगळुरू मधून ताब्यात घेतले आहे.
ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांचे विविध पथके गुन्हे शाखा त्याचा शोध घेत होती परंतु त्याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले.

(हेही वाचा-Netherlands Stun South Africa : नेदरलँड्सचा द आफ्रिकेला दे धक्का, कसा मिळवला तगड्या संघाविरुद्ध विजय )

पाटील याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ऑक्टोबर२०२० मध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनमध्ये सहभाग असल्याप्रकरणीअटक केली होती.अटकेनंतर त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र, हर्निया आणि क्षयरोगासह आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना जूनमध्ये पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
३० सप्टेंबर रोजी नुकत्याच झालेल्या घडामोडीत, पुण्यातील अधिकाऱ्यांनी ललित पाटीलचा साथीदार, सुभाष मंडल, हॉस्पिटल परिसराजवळून सुमारे 1.71 किलोग्रॅम वजनाच्या मेफेड्रोनच्या महत्त्वपूर्ण रकमेसह अटक केली, ज्याची किंमत अंदाजे 2.14 कोटी रुपये आहे. ललित पाटील याने रुग्णालयातील एका कॅन्टीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने मंडल याला  अमली पदार्थ पुरवल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. २ ऑक्टोबर रोजी क्ष-किरण तपासणीसाठी घेऊन गेले असतानाही पाटील रुग्णालयातून पळून जाण्यात यशस्वी झाला.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=In7BzyY4jqg

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.