Lalit Patil : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; वाहन चालकाला अटक

127
Lalit Patil : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; वाहन चालकाला अटक

मुंबई – नाशिक येथील ३०० कोटीच्या ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil) सकिनाका पोलिसांनी १६व्या आरोपीला अटक केली आहे. सचिन वाघ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा वाहन चालक होता व त्याला लपविण्यासाठी मदत केल्याप्रकरणी अटक केली आहे.

सचिन वाघ (३०) असे आरोपीचे नाव असून तो नाशिकच्या पिंपळगाव मधील वाखरी येथील रहिवासी असून तो चालक होता. त्याने २ ऑक्टोबर रोजी पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर ललित पाटील (Lalit Patil) याला त्याने नाशिकहून सुरतला नेले. दरम्यान सचिन वाघ याला एसयूव्हीसह वाहनासह बेंगळुरू येथून पकडण्यात आले. वाघ हा सकिनाका ड्रग्ज प्रकरणातील १६ वा आरोपी आहे.

(हेही वाचा – India’s Airlift mission : जाणून घ्या भारतातल्या टॉप ६ एअरलिफ्ट मिशनबद्दल)

पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, सचिन वाघ याच्या अटकेनंतर साकी नाका पोलिसांनी ३०५ कोटी रुपयांच्या १५१ किलो मेफेड्रोन अमली पदार्थाप्रकरणी (Lalit Patil) एकूण १६ जणांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ ६ ऑक्टोबर रोजी ललित पाटील यांच्या नाशिक युनिटमध्ये जप्त करण्यात आले होते. सचिन वाघ याला कोठडी मिळविण्यासाठी शुक्रवारी स्थानिक न्यायालयात हजर केले. अंमली पदार्थांच्या साठ्याबद्दल सखोल तपशील मिळविण्यासाठी सर्व बाजूने तपास केला जात आहे,” असे चौधरी यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.