Kurla Crime : धक्कादायक! मेट्रो साईटवर सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह

12
Kurla Crime : धक्कादायक! मेट्रो साईटवर सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह

मुंबईतील कुर्ला (Kurla Crime) परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला परिसरात रविवारी (१९ नोव्हेंबर) रात्री एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

या प्रकारची माहिती मिळताच (Kurla Crime) पुढील तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी हा मृतदेह राजावाडी रुग्णालयात दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – MP Rahul Shewale : खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक)

अधिक माहितीनुसार, मध्य मुंबईतील कुर्ला (Kurla Crime) येथे मेट्रो रेल्वेच्या बांधकाम स्थळाजवळ एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला. रात्री १२:३० च्या सुमारास मुंबई पोलिसांना शांतीनगर येथील सीएसटी रोडवर एक अज्ञात सुटकेस पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास (Kurla Crime) शांतिनगर येथील सी. एस. टी. रोडवर एक सुटकेस पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हा शोध लागला, जिथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे.

(हेही वाचा – Hingoli Earthquake: हिंगोली येथे भल्या पहाटे भूकंपाचे धक्के)

“महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही, परंतु मृतदेह पाहून असे मानले जात आहे की तिचे वय २५ – ३० वर्षे असू शकते, महिलेने टी-शर्ट आणि ट्रॅक पँट घातली होती”, असे त्यांनी नमूद केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.