Bogus Doctor: रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर पोलिसांकडून कारवाई

पोलिसांनी बोगस डॉक्टरला पकडण्यासाठी एका पोलीस हवालदाराला पेशंट म्हणून माहिती घेण्यासाठी पाठवलं.

11
Bogus Doctor: रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर पोलिसांकडून कारवाई
Bogus Doctor: रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर पोलिसांकडून कारवाई

बोगस डॉक्टर (Bogus Doctor) बिनदिक्कतपणे दवाखाने उघडून लोकांवर उपचार करत असल्याच्या घटना घडत आहेत. गोवंडीत एक बोगस डॉक्टर दवाखाना चालवत असल्याची खबर पोलिसांना नुकतीच मिळाली. पोलिसांकडून या घटनेबाबत कारवाई करण्यात आली आहे.

अल्ताफ हुसेन खान (५०) या नावाच्या व्यक्तिला गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात बोगस क्लिनिक चालवल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. एक बनावट डॉक्टर पदवी किंवा परवान्याशिवाय क्लिनिक चालवत असल्याची माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

(हेही वाचा – MP Rahul Shewale : खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक)

पोलिसांनी बोगस डॉक्टरला पकडण्यासाठी एका पोलीस हवालदाराला पेशंट म्हणून माहिती घेण्यासाठी पाठवलं. मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर क्लिनिकवर छापा टाकून डॉक्टरला अटक करण्यात आली. आयपीसीच्या कलम ४१९, ४२९ अन्वये आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट, १९६१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.