ED : कोविड बॉडी बॅग घोटाळ्यात ईडीची एन्ट्री

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ

109
ED : कोविड बॉडी बॅग घोटाळ्यात ईडीची एन्ट्री
ED : कोविड बॉडी बॅग घोटाळ्यात ईडीची एन्ट्री

ईडीकडून बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीने मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून या संदर्भातील माहिती आणि कागदपत्रे मागवली आहे. बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात ईडीच्या एन्ट्रीमुळे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोविड-१९ काळात मुंबई महानगर पालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅगमध्ये मोठ्या प्रकरणात घोटाळा झाल्याचे मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात मुंबईतील आग्रीपाडा पोलिस ठाण्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुंबई महानगर पालिकेतील एका वरिष्ठ अधिकारी आणि वेदांत या खाजगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(हेही वाचा – New Air India : ‘महाराजा’ एअर इंडियाबरोबर राहणारच!)

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना अंमलबजावणी संचनालयाची (ईडी) या प्रकरणात एन्ट्री झाली आहे. बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन या घोटाळ्याची माहिती आणि कागदपत्रांची मागणी केली आहे. बॉडी बॅग खरेदीचे कंत्राट देण्यात आलेल्या वेदांत या खाजगी कंपनीकडून पेडणेकर यांना मोठे कमिशन मिळाले होते, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ईडीने आर्थिक गुन्हे शाखेकडून मागविण्यात आलेल्या माहिती व कागदपत्रांवरून ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चौकशीसाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना समन्स पाठविण्यात येणार असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.