Crime : कल्याण हादरले! १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या वासनांध मुसलमानांकडून अत्याचार; रहिवाशांच्या तत्परतेमुळे दोघे गजाआड

94
Crime : कल्याण हादरले! १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या वासनांध मुसलमानांकडून अत्याचार; रहिवाशांच्या तत्परतेमुळे दोघे गजाआड
Crime : कल्याण हादरले! १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या वासनांध मुसलमानांकडून अत्याचार; रहिवाशांच्या तत्परतेमुळे दोघे गजाआड
  • कल्याण : प्रतिनिधी

Crime : कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कचरावेचक १५ वर्षीय मुलीवर भयंकर प्रसंग घडला आहे. या अल्पवयीन मुलीवर आजोबांचे वय असलेल्या दोघा सैनातांनी आळीपिळीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. या प्रकरणी अख्तर मणियार (६०) आणि सलीम शेख (६२) या दोघा नराधम सैतानांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. या दोन्ही नराधमांना फाशीच्या शिक्षेपर्यंत कारवाई करण्यासाठी पोलिसांनी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना केली आहे. (Crime)

कोळसेवाडीतील एका घरातून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलीच्या रडण्यासह आरडाओरडा ऐकू येत होता. मुलीचा ओरडाओरड सुरू असताना आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना जाग आली. रहिवाशांनी घरात जाऊन पाहिले असता घरभर रक्त पसरलेले आढळून आले. पित्त खवळणारा हा प्रकार पाहून रहिवाशांनी तात्काळ ही माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्या मुलीसह दोघे नराधम सैतान आढळून आले. मुलीने दिलेल्या माहितीनुसार या सैतानांनी आपल्यावर आळीपिळीने अत्याचार केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दोन्ही सैतानांना तत्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिडीत मुलगी कचरा संकलनाचे काम करते. आपल्यावर बेतलेल्या भयंकर प्रसंगानंतर तिने स्वतः पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासानंतर पिडीत मुलीच्या जबानीवरून पोलिसांनी या दोन्ही नराधमांविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोघेही पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. (Crime)

(हेही वाचा – Ayushman Bharat Scheme Fraud: सरकारी निधी लाटण्यासाठी थेट ५५ पैकी २७ रुग्णांवर नको असताना केल्या शस्त्रक्रिया; सय्यद मकबूल अहमद शाह निलंबित)

लोकप्रतिनिधींची प्रतिक्रिया

या घटनेनंतर शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना समाजात जागा नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा जलद तपास करून हा खटला जलदगती न्यायालयात सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. (Crime)

पोलिसांचा तपास आणि कायद्याची भूमिका

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकजण एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करतो, तर दुसरा रिक्षा चालक आहे. घटनास्थळी असलेले घर भाड्याने देण्यात आले होते. पिडीत मुलगी सध्या सुरक्षित असून तिला वैद्यकीय तपासणी व समुपदेशन सहाय्य देण्यात आले आहे. पोक्सो कायद्यानुसार अल्पवयीन मुलांवरील गुन्हे जलद गतीने चालविण्याची तरतूद आहे. पोलीस आता आरोपींचा पूर्वीचा रेकॉर्ड आणि या प्रकरणात इतर अन्य कुणी सामील आहे का ? याचा तपास करत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर कल्याण पूर्व परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील रहिवाशांसह महिला संघटनांनी या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. (Crime)

सामाजिक मुद्दा आणि पोलिसांची भूमिका

कचरा गोळा करणाऱ्या मुलांसह असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलींची सुरक्षा हा गंभीर प्रश्न आहे. या घटनेनंतर स्थानिक सामाजिक संस्था आणि महिला बचत गटांनी अशा मुलींसाठी सुरक्षा यंत्रणा आणि जनजागृती वाढविण्याची मागणी केली आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच पोलिसांकडून आरोपींची संख्या आणि अधिकृत माहिती दिली जाणार आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.