Mumbai Crime Branch : घरफोड्या करण्यासाठी विमानाने फिरणारी आंतरराज्यीय बांगलादेशी टोळी गजाआड

अटक करण्यात आलेल्यापैकी शाकिर उर्फ गुड्डू हैदर शेख हा टोळीचा म्होरक्या आहे. गुड्डूवर मुंबईसह इतर राज्यात ३० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

163
CRIME: कर्नाटकात निवडणुकीपूर्वी पोलिसांची कारवाई, ५ कोटी रोख, 106 किलो दागिने जप्त

घरफोड्या करण्यासाठी संपूर्ण देशभरात विमानाने फिरणाऱ्या एका आंतरराज्यीय बांगलादेशी टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. (Interstate bangladeshi gang arrested In Mumbai) देशभरात घरफोड्या करून ही टोळी पश्चिम बंगाल मार्गे बंगालदेशात पळून जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली. या टोळीच्या म्होरक्यासह ६ जणांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाकडून मुसक्या आवळण्यात आलेल्या आहे. (Mumbai Crime Branch)

अटक करण्यात आलेल्यापैकी शाकिर उर्फ गुड्डू हैदर शेख हा टोळीचा म्होरक्या आहे. गुड्डूवर मुंबईसह इतर राज्यात ३० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीत जवळपास ३० ते ३५ बांगलादेशी तरुण सामील आहे. गुड्डू हा प्रत्येक वेळी घरफोडी करण्यासाठी वेगवेगळ्या तरुणाचा वापर करीत असल्याची माहिती तपासत समोर आली आहे. या टोळीला जालना जिल्ह्यातील परतूर येथून एका दुमजली घरातून गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक करून त्यांच्याजवळून घरफोडीसाठी लागणारे साहित्य आणि हत्यारे जप्त करण्यात आली आहे. (Mumbai Crime Branch)

(हेही वाचा – CAA : निवडणुकीच्या आधी देशभरात लागू होणार का CAA?)

असा पकडला गेला गुन्हेगार 

मुंबईत झालेल्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात पाहिजे असलेला शाकिर उर्फ गुड्डू याचा मागील वर्षभरापासून मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) मालमत्ता कक्षाकडून शोध घेण्यात येत होता. मालमत्ता कक्षाने गुड्डूच्या शोधासाठी पश्चिम बंगाल, तेलंगणा, आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पालथे घातले होते परंतु तो मिळून येत नव्हता. अखेर गुड्डू हा जालना जिल्ह्यातील परतूर येथे आपल्या टोळीतील सहकाऱ्यासह लपून बसला असल्याची माहिती मालमत्ता कक्षाला मिळाली. या माहितीच्या आधारे मालमत्ता कक्षाने परतूर येथून या टोळीच्या मुसक्या आवळल्या. (Mumbai Crime Branch)

ही टोळी देशातील अनेक राज्यात घरफोडीचे गुन्हे करीत होती, त्यानंतर दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी ही टोळी विमानाने प्रवास करीत होती. गुड्डू हा आपले टार्गेट पूर्ण झाल्यावर घरफोडीच्या ऐवजासह पश्चिम बंगाल मार्गे चोरट्या मार्गाने बांगलादेश येथे पळून जात होता, काही महिन्यांनी पुन्हा तो दुसऱ्या तरुणांना घेऊन भारतात येऊन घरफोड्या करीत होता अशी माहिती त्याच्या चौकशीत समोर आली आहे. गुड्डू याला यापूर्वी अनेक गुन्ह्यात अटक झालेली असून ४ गुन्ह्यात त्याला शिक्षा झालेली असून ८ गुन्ह्यात त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेले आहे. (Mumbai Crime Branch)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.