IND VS NZ Semi-Final : वानखेडे स्टेडियम पेटवून देण्याची धमकी देणारा निघाला अल्पवयीन

ताब्यात घेण्यात आलेला मुलगा हा क्रिकेटपटू विराट कोहलीचा चाहता असून त्याने धमकी का दिली याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही.

86
IND VS NZ Semi-Final : वानखेडे स्टेडियम पेटवून देण्याची धमकी देणारा निघाला अल्पवयीन
IND VS NZ Semi-Final : वानखेडे स्टेडियम पेटवून देण्याची धमकी देणारा निघाला अल्पवयीन

वानखेडे स्टेडियम या ठिकाणी होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरी दरम्यान स्टेडियमला आग लावण्याची धमकी ‘एक्स'(जुने ट्विटर) देणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला मुंबई गुन्हे शाखेने लातूर येथून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेला मुलगा हा क्रिकेटपटू विराट कोहलीचा चाहता असून त्याने धमकी का दिली याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही. (IND VS NZ Semi-Final)

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरी सामन्यादरम्यान एक्स (ट्विटर)वर अज्ञाताकडून धमकीचा मेसेज पोस्ट करण्यात आला होता. धमकी देणाऱ्याने मुंबई पोलिसांना टॅग करून ही पोस्ट टाकली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ट्विटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोमध्ये टॅग केले आहे. याशिवाय सामन्यादरम्यान आम्ही आग लावू, असा संदेश देणारा फोटोही पोस्ट करण्यात आला होता. (IND VS NZ Semi-Final)

(हेही वाचा – Muslim : वासनांध रहीम खानकडून विवाहित हिंदु महिलेला लग्नासाठी ब्लॅकमेल )

दरम्यान मुंबई पोलिसांनी या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियम भोवती चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान धमकी देणाऱ्या व्यक्तीची माहिती काढली जात असताना मुंबई गुन्हे शाखेने एक्सवर ट्विट करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता तो व्यक्ती लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने लातूर जिल्ह्यातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती अल्पवयीन असून त्याने ही पोस्ट केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ताब्यातील व्यक्ती हा भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याचा जबरदस्त चाहता असल्याचे पोलिसांनी सांगितले, त्याने हे कृत्य का केले याबाबत नेमके कारण कळू शकलेले नाही. (IND VS NZ Semi-Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.