Income Tax Department Raid: जालन्यात नामांकित स्टील कंपनीत आयकर विभागाची धाड, महत्त्वाची कागदपत्रे आणि संगणकातील डेटा ताब्यात

153
Income Tax Department Raid: जालन्यात नामांकित स्टील कंपनीत आयकर विभागाची धाड, महत्त्वाची कागदपत्रे आणि संगणकातील डेटा ताब्यात
Income Tax Department Raid: जालन्यात नामांकित स्टील कंपनीत आयकर विभागाची धाड, महत्त्वाची कागदपत्रे आणि संगणकातील डेटा ताब्यात

जालना येथे (Income Tax Department Raid) एका नामांकित स्टिल कंपनीवर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली आहे. कर चुकवेगिरीच्या संशयावरून मुंबईतील आयकर विभागाच्या पथकाकडून बुधवारपासून हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती उघड झाली आहे.

आयकर विभागाकडून तब्बल २०० जणांच्या पथकाकडून गुरुवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास अचानक ही धाड टाकण्यात आली. विशेष म्हणजे, या कंपनीसह संचालक आणि एका उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आल्याने खळबळ उडाली. आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत कंपनीतील काही महत्त्वाची कागदपत्रे आणि संगणकातील डेटा ताब्यात घेतल्याचीदेखील माहिती समोर येत आहे. संबंधित कंपनीमध्ये जमा-खर्चाचा संशयास्पद व्यवहार आढळल्याचेही सांगितले जात आहे.

(हेही वाचा – 5th And 8th Annual Exams:’आरटीई’ नियमात १४ वर्षांनी पुन्हा बदल, ५वी आणि ८वीची परीक्षा २ एप्रिलपासून)

अनेकदा कर चुकवल्याप्रकरणी कारवाई…
जालना शहरात अनेक स्टील कंपन्या आहेत. काही नामंकित कंपन्यांमधील स्टील देशभरात विक्रीसाठी जाते, मात्र अनेकदा कर चुकवल्याप्रकरणी किंवा व्यवहारात संशयास्पद बाबी आढळून आल्यास वेगवेगळ्या विभागाकडून कारवाया केल्या जातात. अशीच कारवाई गुरुवारी करण्यात आली आहे. जालना एमआयडीसीमध्ये असलेल्या या स्टील कंपनीत गुरुवारी सकाळी 6 वाजता अचानक आयकर विभागाचं पथक पोहचलं. फक्त कंपनीच नाही तर कंपनीच्या संचालकासह एका उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांच्या घरांवर देखील धाड टाकण्यात आली आहे. गुरुवारपासून सुरूचअसलेली चौकशी अजूनही सुरूच असल्याची माहिती मिळत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.