गोव्यातही ISISचे प्रशिक्षण तळ; अटक केलेल्या दहशतवाद्यांचा काय होता कट?

95

देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल दहशतवाद्यांचे जाळे विणले आहे, तसे आता गोव्यातही दहशतवाद्यांनी तळ उभारले आहे का, अशी घटना समोर आली आहे. गोव्यात ISISच्या अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी अटक करण्यात आलेले अतिरेकी देशात तब्बल १८ ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये मुहंमद शाहनवाज आलम उर्फ अब्दुल्ला उर्फ मोहम्मद इब्राहिम उर्फ प्रिन्स (३१), मुहंमद रिजवान अश्रफ (२८) आणि मुहंमद अर्शद वारसी (२९) अशी त्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

 ISIS च्या तीन दहशतवाद्यांना पुणे पोलीस आणि राष्ट्रीय दहशतवादी पथक (NIA) यांनी मध्य दिल्ली इथून अटक केली आहे. आश्चर्य म्हणजे या दहशतवाद्यांनी पश्चिम घाटातील गोव्यासह कर्नाटकातील काही भागांत आपले तळ उभारले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांमध्ये शाहनवाज हा NIAच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत होता. तो ISIS साठी काम करतो. या तिघांनी अभियांत्रिकीचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी एक सध्या जामिया मिलिया इस्लामिया (JMI) येथून पीएचडी करत आहे. या तीन दहशतवाद्यांनी हिंदू मंदिरे, मजार यांसह मुंबई, सुरत, वडोदरा, गांधीनगर आणि अहमदाबादमधील व्हीआयपी राजकीय नेत्यांचे मार्ग अशा तब्बल १८ ठिकाणी रासायनिक बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. पुणे, बंगळुरू आदी ठिकाणाहून तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादामध्ये ओढण्याचे काम सुरू केले होते. या तरुणांना रासायनिक घातक बॉम्ब कसे बनवायचे आणि कट यशस्वी कसा करायचा, यांचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी तळ उभारले होते. यातील एक तळ गोव्यातही होता.

(हेही वाचा जातीनिहाय जगणनेच्या मुद्द्यावर PM Narendra Modi यांचा काँग्रेसवर जोरदार प्रहार; म्हणाले…)

ISISचे दहशतवादी कोणत्या ठिकाणी उभारणार होते तळ? 

गोवा, लवासा (पुणे), महाबळेश्वर, हुबळी, उडुपी (कर्नाटक), केरळमधील वलसाड अभयारण्य, नल्लामला पर्वत रांगा आणि चांदौली इथे हे दहशतवादी तळ उभारणार होते. पुण्याजवळील लवासाच्या जंगलात त्यांनी बॉम्बस्फोटाची पहिली चाचणी घेतली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.