Sanjeev Jaiswal : आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांची ईडीकडून तब्बल १० तास चौकशी

192
Sanjeev Jaiswal : आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांची ईडीकडून तब्बल ९ तास चौकशी
Sanjeev Jaiswal : आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांची ईडीकडून तब्बल ९ तास चौकशी

सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांची कोव्हिड टेंडर घोटाळा प्रकरणी ईडीने तब्बल १० तास चौकशी केली. सकाळी ११.३०च्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झालेले जयस्वाल हे रात्री १० वाजता ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. कोव्हिड टेंडर आणि जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात युवा सेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्याकडे ईडीने चौकशी केल्यानंतर मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्याकडे चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावले होते.

शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता जयस्वाल हे ईडीच्या बलोर्ड पियर येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. महामारीच्या काळात कोविड-संबंधित कामावर मनपाच्या खर्चाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांचे म्हणणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोंदवून घेत ईडीकडून जयस्वाल यांची तब्बल १० तास चौकशी केली. संजीव जयस्वाल हे कोव्हिड काळात मुंबई महानगरपालिकेचे तात्कालीन अतिरिक्त आयुक्त होते, त्यावेळी कोव्हिड संबंधित हॉस्पिटलशी संबंधित करार केला होता, त्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. मनपाने कोव्हिडच्या काळात केलेल्या ४ हजार कोटी रुपयांच्या खर्चाची ईडीकडून चाैकशी करण्यात येणार आहे.

जयस्वाल यांनी सुजित पाटकर भागीदार असलेल्या एलएचएमएस कंपनीला कंत्राट दिले होते. या प्रकरणी ईडीने गेल्या आठवड्यात जयस्वाल यांच्या घराची झडती घेऊन तपास सुरू केला होता. ईडीने यापूर्वी मनपाने एलएचएमएसला जारी केलेल्या ३० कोटी रुपयांचा मनी ट्रेलचा तपास केला असता या तपासात ७५ टक्के रक्कम शेल कंपन्यांच्या खात्यावर वळती करण्यात आली आणि केवळ ८ कोटी रुपये दहिसर येथील जम्बो कोव्हिड सेंटरसाठी वापरण्यात आल्याचे ईडीला आढळले. हा पैसा विविध शेल कंपन्यांकडे वळवण्यात आला आणि वैयक्तिक कारणासाठी वापरण्यात आल्याचे ईडीला आढळून आले आहे.

(हेही वाचा – अखेर शासकीय कर्मचाऱ्यांना १ जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू; कर्मचाऱ्यांच्या लढाईला यश)

ईडीने गेल्या आठवड्यात जैस्वाल यांच्या घराच्या झडतीत मढ आयलंड येथे अर्धा एकर जमीन, त्याच्या पत्नीसह त्याच्या मालकीचे अनेक फ्लॅट आणि १५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी (एफडी) यासह २४ मालमत्तांची कागदपत्रे तपासासाठी ताब्यात घेतली होती. दरम्यान या सर्व संपत्तीचा हिशेब जयस्वाल यांनी ईडीच्या अधिकारी यांना दिला आहे. ईडीच्या तपासात आलेली जयस्वाल यांची ३४ कोटीची मालमत्ता आहे, यापैकी बहुतेक मालमत्ता त्यांच्या पत्नीला तिचे वडील (निवृत्त आयआरएस अधिकारी), आई आणि आजी-आजोबा यांच्याकडून वारशाहक्काने मिळाल्या असल्याचे जयस्वाल यांनी माहिती दिली आहे, तसेच त्यांनी या सर्व मालमत्ता सरकारला जाहीर केल्या होत्या आणि त्यांनी स्वेच्छेने ईडी अधिकाऱ्यांना कागदपत्रे सादर केली होती.

ईडीकडून मनपाला पत्र

दरम्यान, ईडीने मनपाला पत्र लिहून कोविड कालावधीतील झालेला एकूण खर्च, प्रत्येक पुरवठादारांना दिलेले खर्च, वाटप केलेले टेंडर आणि पेमेंट याविषयी तपशील मागविण्यात आला आहे. लाईफलाईन कंपनीशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी सर्व खर्चाची कागदपत्रे आणि मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागवार खर्चाची माहितीही ईडीकडून मागवण्यात आली आहे. कोव्हिड काळात एकूण किती टेंडर काढण्यात आली, कोणकोणत्या कंत्राटदारांना दिली आणि किती रुपयांना दिली यांची अधिक माहिती देखील मागविण्यात आली आहे, ईडीकडून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांना हे पत्र पाठवून ही सर्व माहिती मागवण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.