Gelatin Sticks Seized : मुंब्रा रेतीबंदर किनारी जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर्स सापडल्याने खळबळ

अनेक कांड्या जिवंत असल्याने त्या इतर ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी देखील वापरल्या जाऊ शकतात.

101
Gelatin Sticks Seized : मुंब्रा रेतीबंदर किनारी जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर्स सापडल्याने खळबळ
Gelatin Sticks Seized : मुंब्रा रेतीबंदर किनारी जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर्स सापडल्याने खळबळ

मुंब्रा रेतीबंदर किनारी १६ जिलेटिनच्या कांड्या व १७ डिटोनेटर्स पोलिसांनी जप्त केले आहेत. (Gelatin Sticks Seized) या कांड्या पाण्याखाली स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येतात अशी माहिती देण्यात आली.  या कांड्यांपैकी अनेक कांड्या जिवंत असल्याने त्या इतर ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी देखील वापरल्या जाऊ शकतात. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

(हेही वाचा – Security Of Rammandir : रामजन्मभूमी परिसराची सुरक्षाव्यवस्था विशेष सुरक्षा दलाकडे सोपवणार)

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कळवा रेती बंदर परिसर खाडीचे सुशोभीकरण करून येथे रेतीबंदर विसर्जन घाट बनवण्यात आला. या परिसरामध्ये असलेली निसर्गरम्य वातावरण लक्षात ठेवून महानगरपालिकेने या ठिकाणी नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली मात्र आता हीच सुविधा या परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना धोकादायक वाटत आहे. या परिसरात मागील वर्षभरात 15 मृतदेह सापडले आहेत. त्यामधील २ हत्या या उघडकीस आल्या आहेत. या ठिकाणी असलेला सुरक्षेचा अभाव आणि शेजारीच असलेला राष्ट्रीय महामार्ग याचाच फायदा घेत गैरकृत्य करणारी लोक या भागात मृतदेह फेकत आहेत. पोलीस आणि पालिका प्रशासन यांचा देखील हलगर्जीपणा होत असल्यामुळेच हे प्रकार येथे वारंवार घडत आहेत. दिवसभरात याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या हजारोंची आहे असे असले तरी रात्री या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसते आणि याचाच फायदा घेत गैरप्रकार आता वाढू लागले आहेत. खाडीमध्ये टाकलेला मृतदेह स्वतःहून नष्ट होऊ शकतो आणि म्हणूनच या परिसरात मृतदेह टाकण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत. (Gelatin Sticks Seized)

खाडीकिनारी गस्त वाढवायची गरज

मुंब्रा रेतीबंदर हे मृतदेह फेकण्यासाठी एक कुख्यात ठिकाण आहे. गेले अनेक वर्ष  येथे अवैधरित्या रेती उत्खननाचे काम देखील अविरतपणे सुरू आहे. याच ठिकाणी मनसुख हिरेन याच्या शवासोबतच आत्तापर्यंत १६ मृतदेह देखील सापडले होते. या ठिकाणी आज पुन्हा एकदा जिलेटीन कांड्या आणि डिटोनेटर्स मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या आधी देखील अशा जिलेटीनच्या कांड्या वापर करून दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणले होते. त्यामुळे खाडीकिनारी गस्त वाढवायची गरज असताना रात्रीच्या वेळी इथे मात्र स्मशानशांतता असते.

घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने १६ जिलेटिनच्या कांड्या, १७ डिटोनेटर्स आणि दोन मोठ्या बॅटऱ्यांसह सर्व साहित्य ताब्यात घेतले असून सखोल चौकशी सुरु केली आहे. घटनास्थळावरून एक मोबाईलचा रिकामा खोका देखील मिळाला असून त्यावर असलेल्या imei नंबर चा वापर गुन्हेगारांना शोधण्यासाठी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Gelatin Sticks Seized)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.