Mumbai Crime : पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

पतीचा एन्काऊंटर करण्याची धमकी देऊन केला अत्याचार

133
Mumbai Crime : पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
Mumbai Crime : पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

एका ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. या पोलीस अधिकाऱ्याने पीडित महिलेचे विवस्त्र छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन तसेच कुटुंबाला एन्काऊंटरमध्ये ठार मारण्याची धमकी या अधिकाऱ्याने दिली होती असा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. (Mumbai Crime)

विश्वास पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. विश्वास पाटील सध्या राज्य दहशतवाद विरोधी पथकात (ATS) सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर आहे. २०१९ मध्ये मुंबई पोलीस दलाच्या खंडणी विरोधी पथकात असताना गँगस्टर रवी पुजारी याचे भारतात प्रत्यार्पणासाठी खंडणी विरोधी पथकाकडून त्याच्या गुन्ह्याच्या संदर्भातील कागदपत्राची जुळवाजुळव सुरू असताना अधिकारी पाटील हे पीडित महिलेच्या संपर्कात आले होते. पीडित महिलेला तिच्या व्यवसायात मदत करण्याचे आणि पोलीस खात्याकडून तिला कामे देण्याचे अमिष दाखवून पाटील तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागले. (Mumbai Crime)

पाटीलने पीडितेला जवळ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु पीडितेने त्याला जवळ येऊ दिले नाही. अखेर विश्वास पाटील या पोलीस अधिकाऱ्याने पोलीस अधिकारी असल्याचा फायदा उचलत पीडितेला पोलीस खात्याकडून काम देण्यासाठी कागदपत्रे घेण्याच्या नावाखाली दादर येथे एका इमारतीत असलेल्या कार्यालयात आणून शीतपेय पिण्यासाठी दिले. त्यानंतर पीडितेच्या शरीराला पाटील यांनी नको तिथे स्पर्श करण्यास सुरुवात केली. तीने विरोध करताच तीच्या पतीला एन्काऊंटरमध्ये ठार मारण्याची धमकी दिली, तसेच पीडितेला ठार करून तो अपघात असल्याचे सिद्ध करू अशी धमकी देऊन बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. (Mumbai Crime)

त्यानंतर पीडितेचे विवस्त्र छायाचित्रे काढून ते व्हायरल करण्याची तर कधी कुटुंबाला गुंडामार्फत ठार करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर मागील तीन वर्षांपासून विश्वास पाटील हे अधिकारी तिच्या मागावर असून, तिच्यावर आणि तिच्या मुलावर लक्ष ठेवून शाळा कॉलेजला जाताना मुलाचे फोटो काढून पीडितेला पाठवून तुझा पती लवकरच मरणार असून मी तुझ्या घरी येऊन राहणार आहे, अशी धमकी जुलै २०२३ मध्ये पाटील यांनी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. मुलांच्या आणि पतीच्या जीवाला पाटील पासून धोका असल्यामुळे अखेर पीडितेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Kolhapur Amba bai Temple : तोफेच्या सलामीने होणार घटस्थापना)

अत्याचारापूर्वी पाटील यांच्या वागणुकीबाबत पीडितेने खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार देखील केली होती. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू असे त्यांना सांगितले होते. परंतु मी पाटील यांना समजावतो परंतु तुम्ही वरिष्ठांकडे जाऊ नका अशी विनंती सावंत यांनी पीडितेकडे केली होती, असे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक यांनी वेळीच या प्रकरणाची दखल घेतली असती तर पीडितेवरील प्रसंग टळला असता अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे. या प्रकरणी आझाद १ मैदान पोलिसांनी सपोनि. विश्वास पाटील यांच्याविरुद्ध भादवी. कलम ३८६ (२) (एन) वारंवार लैंगिग अत्याचार करणे, ३७७ अनैसर्गिक अत्याचार, स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दल ३२३, ५०४, शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान, ५०६ धमकी देणे, ५०९ जो कोणीही, कोणत्याही महिलेच्या शालीनतेचा अपमान करण्याचा हेतू असेल, ३५४(डी) सह ६६ इ ६६ ई माहिती तंत्रज्ञान आयटी कायदा, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.