Kolhapur Amba bai Temple : तोफेच्या सलामीने होणार घटस्थापना

उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच मंदिर अंबा माता की जयच्या गजराने दुमदुमून गेले आहे.

20
Kolhapur Amba bai Temple : तोफेच्या सलामीने होणार घटस्थापना
Kolhapur Amba bai Temple : तोफेच्या सलामीने होणार घटस्थापना

आदिशक्तीचा जागर करणारा नवरात्रोत्सव रविवारपासून संपूर्ण देशभरात सुरु होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची तयारी पूर्ण झाली असून सकाळी साडे आठ वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना होईल. उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच मंदिर अंबा माता की जयच्या गजराने दुमदुमून गेले आहे. (Kolhapur Amba bai Temple )

अंबाबाईचा नवरात्रौत्सव देशभरात प्रसिद्ध असून याकाळात २५ लाखावर भाविकांची नोंद होते. घटस्थापनेला देवीची पारंपारिक बैठी पूजा बांधली जाते. सकाळी साडे अकराच्या शासकीय पूजेनंतर दुपारची आरती होईल त्यानंतर दुपारी ३ वाजता सालंकृत पूजा बांधण्यात येईल. उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच अंबाबाई मंदिर अंबा माता की जय च्या गजराने दुमदुमून गेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण मंडळे देवीची ज्योत नेण्यासाठी मंदिरात दाखल झाले आहेत. ज्योत लावल्यानंतर देवीच्या नावाचा गजर करून ते आपआपल्या गावाला मार्गस्थ होत आहेत.

(हेही वाचा : India- Srilanka ferry : भारत – श्रीलंका दरम्यान नवीन फ़ेरीचा मोदींच्या हस्ते शुभारंभ)

गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची तयारी पूर्ण झाली असून समितीच्या कार्यालयासमोर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य व सुंदर मांडव उभारण्यात आला आहे. तसेच आकर्षक रोषणाई ही करण्यात आली आहे. तेथे मंदिर परिसराला करण्यात येणाऱ्या फुलांची रचना केली जात आहे. मोठा पोलीस बंदोबस्त यंदा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाविकांची संख्या वाढणार हे गृहीत धरून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून शनिवारी सायंकाळी बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. दक्षिण दरवाजाबाहेरील परिसरात पोलीस कंट्रोल रुम उभारण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.