ED : ईडीकडून राज कुंद्रा यांची ९७ कोटींची मालमत्ता जप्त

ED : मेसर्स व्हेरिएबल टेक पीटीई लिमिटेड या कंपनीचे संचालक आणि एमएलएम एजंट यांनी सन २०१७ मध्ये ६ हजार ६०० कोटी रुपयांचा बिटकॉइन घोटाळा केला होता.

198
ED : ईडीकडून राज कुंद्रा यांची ९७ कोटींची मालमत्ता जप्त
ED : ईडीकडून राज कुंद्रा यांची ९७ कोटींची मालमत्ता जप्त
‘बिटकॉइन स्कॅम’ (Bitcoin Scam) प्रकरणात शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ईडीकडून (ED) तात्पुरती स्वरूपात जप्त करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेला जुहू येथील फ्लॅट आणि पुण्यातील बंगल्याचा समावेश असल्याची माहिती ईडीने (ED) प्रसिध्दी पत्रकात दिली आहे. ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा २००२ (PMLA) च्या तरतुदींतर्गत करण्यात आली आहे. (ED)

(हेही वाचा- Ramdas Athawale:“कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार बारामतीचा किल्ला”,रामदास आठवलेंचा विरोधकांवर निशाणा)

पोंझी स्कीम राबवून लोकांची फसवणूक
मेसर्स व्हेरिएबल टेक पीटीई लिमिटेड या कंपनीचे संचालक आणि एमएलएम एजंट यांनी सन २०१७ मध्ये ६ हजार ६०० कोटी रुपयांचा बिटकॉइन घोटाळा केला होता. बिटकोईनच्या माध्यमातून १० टक्के परतावा देण्याच्या नावाखाली पोंझी स्कीम राबवून लोकांकडून ही रक्कम स्वीकारून लोकांची फसवणूक करण्यात आली होती. मुंबई आणि दिल्ली येथे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या आधारे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) (ED) ने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी १७ डिसेंबर २०२३ रोजी मेसर्स व्हेरिएबल टेक पीटीई लिमिटेड या कंपनीचे संचालक सिम्पि भारद्वाज (Simpi Bhardwaj), नितीन गौर (Nitin Gaur) आणि निखिल महाजन (Nikhil Mahajan) या ३ जणांना अटक करण्यात आली होती. हे सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
अमित भारद्वाजकडून २८५ बिटकॉइन्स घेतल्याचे ईडीच्या तपासात उघड
या गुन्ह्यातील  मुख्य आरोपी अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज अद्याप फरार आहेत.  यापूर्वी ईडीने ६९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.  दरम्यान  अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पती रिपू ​​सुदान कुंद्रा उर्फ ​​राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म उभारण्यासाठी गेन बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याचा मास्टर माईंड आणि प्रवर्तक अमित भारद्वाज यांच्याकडून २८५ बिटकॉइन्स घेतल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.  हे बिटकॉइन्स अमित भारद्वाज यांना गुन्ह्यातून मिळालेल्या गुंतवणुकदारांकडून मिळाले आहेत. हा करार पूर्ण न झाल्यामुळे, कुंद्रा यांच्या ताब्यात अजूनही २८५ बिटकॉइन्स आहेत आणि सध्या या बिटकोईनची किंमत १५० कोटीपेक्षा जास्त आहे. (ED)
गुरुवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी (ED), मुंबई विभागाने तात्पुरत्या स्वरुपात रिपू ​​सुदान कुंद्रा उर्फ ​​राज कुंद्रा यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA),२००२ च्या तरतुदींतर्गत ​​राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या मालकीच्या ९७.७९ कोटी रुपयांच्या संलग्न मालमत्तेवर जप्ती आणली आहे, या संपत्तीपैकी शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) नावावर असलेल्या जुहू येथे असलेल्या निवासी फ्लॅटचा समावेश आहे. तसेच पुण्यात असलेला निवासी बंगला आणि राज कुंद्राच्या नावावर इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. (ED)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.