Drugs Mafia Lalit Patil : ललित पाटील आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया ‘पाब्लो एस्कोबार’ चा चाहता

'पाब्लो एस्कॉबार' सारखी आपल्यावर एके दिवशी वेब सिरीज (web series) बनेल असा दावा ललित पाटील करीत आहे.

123
Drugs Mafia Lalit Patil : ललित पाटील आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया 'पाब्लो एस्कोबार' चा चाहता
Drugs Mafia Lalit Patil : ललित पाटील आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया 'पाब्लो एस्कोबार' चा चाहता

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थच्या दुनियेतील गॉडफादर म्हणून ओळखला जाणारा आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया ‘पाब्लो एस्कॉबार’ (Pablo Escobar) चा ललित पाटील हा चाहता असून त्याचीच प्रेरणा घेऊन ललित पाटील याने ड्रग्सच्या धंद्यात प्रवेश केला. आपल्याला पाब्लो एस्कोबार सारखे बनायचे आहे, ‘पाब्लो एस्कॉबार’ सारखी आपल्यावर एके दिवशी वेब सिरीज (web series) बनेल असा दावा ललित पाटील करीत आहे. (Drugs Mafia Lalit Patil)

३०० कोटीच्या ड्रग्स प्रकरणात सकिनाका पोलिसांच्या कोठडीत असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला वेबसिरीजचे भयंकर वेड आहे. त्याने अटकेबाहेर असताना अनेक गुन्हेगारी, ड्रग्स वरील अनेक वेबसिरीज बघितल्या आहेत. या बेवसिरीजपैकी आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफीया ‘पाब्लो एस्कोबार’ याची वेबसिरीज बघून तो त्याचा मोठा चाहता झाला, त्याची प्रेरणा घेऊन त्याने ड्रग्सच्या धंद्यात मोठं नाव कमावयाचे स्वप्न बघितले आहे. (Drugs Mafia Lalit Patil)

(हेही वाचा – Sports Competition : मुरबाडच्या महाराष्ट्र मिलिटरी शाळेची रायफल शुटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी)

पाब्लो एस्कोबार (Pablo Escobar) प्रमाणे एके दिवशी आपल्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाची वेब सिरीज (web series) बनेल अशी ललित पाटील आशा बाळगून आहे. पाटील याने देखील कबूल केले की, लक्ष वेधण्यासाठी त्याने या प्रकारचे स्टंट केले आणि प्रसिद्धी मिळवली. त्याने प्रसारमाध्यमांसमोर देखील खोटी विधाने केली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस सूत्राने दावा केला की, पाटीलच्या अटकेनंतर, त्याच्या लक्षात आले की प्रसारमाध्यमे त्याचे विविध राजकीय पुढाऱ्यांशी संबंध जोडत आहे. त्याने प्रसिद्धी मिळविण्यासाठी प्रसार माध्यमांसमोर खोटी विधाने करून खळबळ उडवून दिली होती. २०२० मध्ये अटक झाल्या पासून तुरुंगात असलेला ललित पाटील याने रुग्णालयात दाखल होण्यासाठी देखील पडून जखमी झाल्याचे स्टंट केले होते. ससून रुग्णालयात असतांना त्याने पळून जाण्याचा स्टंट केला होता असेही समोर येत आहे. (Drugs Mafia Lalit Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.