Drugs case : पनवेल रेल्वे स्थानकावर ३६ कोटींचे अमली पदार्थ जप्त, एनसीबी,आरपीएफ सीबीआयची संयुक्त कारवाई

पनवेल रेल्वे स्थानकावर एका परदेशी महिलेला कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे

237
Drug case : पनवेल रेल्वे स्थानकावर ३६ कोटींचे अमली पदार्थ जप्त, एनसीबी,आरपीएफ सीबीआयची संयुक्त कारवाई
Drug case : पनवेल रेल्वे स्थानकावर ३६ कोटींचे अमली पदार्थ जप्त, एनसीबी,आरपीएफ सीबीआयची संयुक्त कारवाई
पनवेल रेल्वे स्थानकावर एका परदेशी महिलेला कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे. या महिलेकडून ३६ कोटी रुपयांचा कोकेन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून ही कारवाई नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) बेंगळुरू, रेल्वे संरक्षण दल (RPF) पनवेल आणि क्राइम इंटेलिजन्स ब्रँच (CIB) कुर्ला यांनी संयुक्तरित्या केली आहे.शुक्रवारी पनवेल रेल्वे स्थानकावर येणारी हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस ट्रेनमध्ये तस्करीचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याची माहिती एनसीबीने अधिकाऱ्यांना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. माहिती मिळताच, तातडीने एक पथक तयार करण्यात आले.(Drug case)
ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर पोहोचताच, टीमला ती नायजेरियन महिला सापडली, जिने स्वतःची ओळख एटुमुडोन डोरिस म्हणून करून दिली आणि ती एका बाळासोबत प्रवास करत होती जो तिने दावा केला होता की ते तिच मूल आहे.चौकशी केल्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेने हे अंमली पदार्थ आपल्याकडे असल्याचे कबूल केले.
पथक तिला आरपीएफ चौकीवर घेऊन गेले, जिथे त्यांना तिच्या बहुरंगी ट्रॅव्हल बॅगेत “व्हिंटेज” असे लेबल असलेले दोन आयताकृती काळे पॅकेजेस सापडले.(Drug case)
तपासणी केली असता, दोन्ही पॅकेजमधील पदार्थ कोकेन असल्याचे निश्चित झाले, ज्याचे एकूण वजन २.००२ किलो होते. तिच्याकडून १.४८८ किलो वजनाचे मेथाम्फेटामाइन देखील जप्त करण्यात आले.(Drug case)
एनसीबी बेंगळुरूचे ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर मुरारी लाल यांनी जप्त केलेले ड्रग्ज अधिकृतपणे ताब्यात घेतले. जप्तीप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे.(Drug case)
हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.