Dharashivमध्ये माजी सैनिकाच्या घरावर दरोडा, जीवघेणा हल्ला करून मौल्यवान वस्तूंची चोरी

102
Dharashivमध्ये माजी सैनिकाच्या घरावर दरोडा, जीवघेणा हल्ला करून मौल्यवान वस्तूंची चोरी
Dharashivमध्ये माजी सैनिकाच्या घरावर दरोडा, जीवघेणा हल्ला करून मौल्यवान वस्तूंची चोरी

Dharashiv  धाराशिव तालुक्यातील परंडा तालुक्यातील कुंभेजा शिवारात मध्यरात्री घडलेल्या धाडसी दरोड्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सशस्त्र दरोडेखोरांनी एका माजी सैनिकाच्या घरावर दरोडा (House robbery) टाकल्याची घटना घडली आहे.

विश्वनाथ मुरलीधर जगताप (७०) असे या निवृत्त सैनिकाचे नाव असून ते भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर सेवा बजावत होते. मिळालेल्या माहितीनुसार, जगताप हे आपल्या पत्नीसह कुंभेजा येथील शेतातील घरात राहतात. रविवारी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास परिसरात वीजपुरवठा खंडित असल्याचा फायदा घेऊन सहा सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर धाड टाकली. दरोडेखोरांनी घरात घुसून कपाट उपसले आणि मौल्यवान वस्तू चोरल्या. त्यांनी जगताप यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेदेखील हिसकावून घेतले. त्यावेळी जगताप यांनी धैर्याने दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने पाच ते सहा वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा  – IPL 2026 : पंजाबची दिल्लीवर ६ विकेट्सने मात,के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ

दरोडेखोरांशी दोन हात करताना ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र या वयातही दरोडेखोरांना चोप देण्याच्या त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे सगळ्यांनी कौतुक केले.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.