Delhi Crime : दिल्ली पुन्हा हादरली! पुन्हा सापडले तरुणीच्या शरिराचे तुकडे

170
Delhi Crime : दिल्ली पुन्हा हादरली! पुन्हा सापडले तरुणीच्या शरिराचे तुकडे

देशाची राजधानी दिल्ली हळूहळू गुन्हेगारी (Delhi Crime) क्षेत्राची राजधानी बनत चालली आहे. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील गुन्हेगारीचा आलेख चढताच राहिला आहे. अशातच पुन्हा एकदा दिल्लीमध्ये एका तरुणीच्या शरीराचे तुकडे सापडले आहेत. हे तुकडे दिल्लीमधील गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ सापडले आहेत.

या प्रकारामुळे पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण झाली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडप्रमाणेच हे नवं हत्याकांड समोर आलं आहे. एका महिलेचा खून करुन तिच्या शरिराचे तुकडे शहराजवळील एका पुलाजवळ आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याचा तपासही सुरु करण्यात आला आहे.

(हेही वाचा – इयत्ता बारावी ते नववी पर्यंत लागू होणार सेमिस्टर पद्धत)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना वर्दी मिळाली की बुधवारी (१२ जुलै) सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास महिलेच्या शरिराचे तुकडे गीता कॉलनी फ्लायओव्हर भागात विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या वर्दीनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तसेच त्यांनी चौकशी सुरु केली.

महिलेचे वय ३५ ते ४० वर्षे असू शकते

उपायुक्त सागर सिंह कलसी यांनी सांगितल्यानुसार हा मृतदेह महिलेचा आहे. या महिलेचे वय ३५ ते ४० च्या जवळपास आहे. मात्र ऑर्थो फॉरेन्सिक अहवालानंतर याची पुष्टी होईल. सध्या शहर पोलिस ठाण्यात 302 (हत्या) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुरावे गोळा करण्यासाठी परिसरात शोध घेतला जात आहे. आतापर्यंत दोन ठिकाणी मृतदेह सापडले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.