अल्पवयीन मुलीबद्दल समाजमाध्यमांवर अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून तिची बदनामी केल्याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तिघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेला पोलिसांनी गुजरात (Gujarat) मधील एका हॉटेलमधून अटक केली असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. (Crime)
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०२५ रोजी एका व्हॉट्सॲप (WhatsApp) ग्रुपवर पीडित अल्पवयीन मुलीबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिप्पणी करण्यात आली होती. या संदेशांमध्ये मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिची समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींनी संगनमत करून जाणीवपूर्वक खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचे एफआयआरमध्ये (FIR) नमूद करण्यात आले आहे. (Crime)
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. मुख्य आरोपी महिला गेल्या १० दिवसांपासून फरार होती. अखेर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सापळा रचून तिला गुजरात येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. (Crime)
(हेही वाचा – MNS : “मी मराठी बोलतो, माझ्या रिक्षात बसा”; संपाचा काटा काढण्यासाठी मनसेची स्टिकर मोहीम, परप्रांतीयांचाही पाठिंबा!)
या प्रकरणाला तेव्हा वेगळे वळण मिळाले जेव्हा एका आरोपीने तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाच धमकावल्याचे समोर आले. “तुमची वर्दी उतरवायला लावेन,” अशा शब्दांत आरोपीने पोलिसांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. यामुळे या गुन्ह्याचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. (Crime)
पोलीस सध्या या प्रकरणातील डिजिटल पुरावे, चॅट रेकॉर्ड्स आणि इलेक्ट्रॉनिक डेटाची कसून तपासणी करत आहेत. यामागे काही मोठे षडयंत्र आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. फरार असलेल्या इतर दोन महिला आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

