Crime News : अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने पळवले ; घटना कॅमेऱ्यात कैद

141
Crime News : अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने पळवले ; घटना कॅमेऱ्यात कैद
Crime News : अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने पळवले ; घटना कॅमेऱ्यात कैद

उत्तर प्रदेशातील शामली येथील एका रुग्णालयात संतापजनक प्रकार (Crime News) घडला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगारवरील सोन्याचे दागिने चोरताना वॉर्ड बॉय सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित वॉर्ड बॉयविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (Crime News)

हेही वाचा-Jammu and Kashmir Flood : ऐन उन्हाळ्यात जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी! अचानक पूर आल्याने १०० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त ; बचावकार्य सुरू, Video Viral 

बाबरी परिसरातील हिरणवाडा गावातील सचिन कुमार यांची पत्नी २६ वर्षीय श्वेता हिचा शनिवारी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. तिचा मृतदेह तपासणीसाठी जिल्हा संयुक्त रुग्णालयात नेण्यात आला.बाबरी पोलिस स्टेशनमधील महिला पोलिस अधिकारी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यापूर्वी तपासणी करण्यासाठी आल्या, तेव्हा त्यांना महिलेच्या सोन्याच्या कानातले गायब असल्याचे आढळले. कुटुंबातील सदस्यांनी सुरुवातीला पोलिसांवर दागिने चोरीचा आरोप केला. (Crime News)

हेही वाचा- Omar Abdullah यांचे विमान दिल्ली ऐवजी पोहचले राजस्थानला !

तपासादरम्यान, वॉर्ड बॉयने एक कानातले पोलिसांना दिले आणि दावा केला की त्याला ते जमिनीवर सापडले. त्याच्या कथेवर संशय आल्याने कुटुंब आणि पोलिसांनी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर आहुजा यांना सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वॉर्ड बॉय मृत महिलेच्या अंगावरील दागिने काढताना स्पष्ट दिसला. यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले असता तो रुग्णालयातून पळून गेला. (Crime News)

हेही वाचा- Election Commission : 22 कोटी मतदार ‘आधार’शी लिंक नाहीत ; आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी

दरम्यान, सचिन कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी आदर्श मंडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. (Crime News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.