Crime : आळेफाटा येथे ३१ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त

या प्रकरणी टेम्पोचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर टेम्पोची तापसणी करण्यात आली.

68
Crime : आळेफाटा येथे ३१ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त
Crime : आळेफाटा येथे ३१ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त

गुजरातहून पुण्याकडे बेकायदा गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुणे- नाशिक महामार्गावरील आळे (ता. जुन्नर)गावच्या हद्दीत डोंगरे फर्निचर या दुकानासमोर नाकाबंदी केली असता, (crime) गुजरातहून आलेला एम.एच.१७ के.ए.९७१७ हा टेम्पो पोलिसांना संशयितरित्या आढळून आल्याने टेम्पो चालकाची चौकशी केली, अशी माहिती आळेफाटा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली आहे.

या प्रकरणी टेम्पोचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर टेम्पोची तापसणी करण्यात आली. त्यामध्ये विनापरवाना, बेकायदेशीररित्या प्रतिबंधित असलेला विमल कंपनीचा सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू आणि आर.एम.डी. नावाची सुगंधित सुपारी असा एकूण ३१ लाख ४ हजार रुपये किमती मुद्देमाल सापडल्याने टेम्पोचालक ओंकार हिरामण सांडभोर (२२, रा. सांडभोरवाडी, रा. राजगुरुनगर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ४६ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल टेम्पो-ट्रकसह जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुनील बडगुजर हे करत आहेत.

(हेही वाचा – Tourist Places in Himachal Pradesh : थंडीतही हिमाचल प्रदेशमधील ही १० ठिकाणे खेचतात पर्यटकांची गर्दी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.