Crime: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी २ तरुणांवर गुन्हा दाखल

320
Crime: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी २ तरुणांवर गुन्हा दाखल
Crime: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी २ तरुणांवर गुन्हा दाखल

धार्मिक भावना दुखावल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ आणि २५ जानेवारी रोजी हे प्रकार उघडकीस आले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई केली. सोशल मिडियावर व्हायरल केलेल्या व्हिडियोनंतर ही घटना उघडकीस आली. (Crime)

मीरा-भाईंदर येथे घडलेला दोन गटातील वादाचा व्हिडीओ साळोख येथील अरमान शेख या तरुणाने रिपोस्ट केल्याचा प्रकार २५ जानेवारी रोजी उघडकीस आला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कळंब, बोरगाव, खैरपाडा, उंबरखंड, वारे येथील शेकडो तरुणांनी शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी कळंब पोलीस चौकीला घेराव घालण्यात आला. या प्रकरणाची दखल घेत नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी घटनास्थळी दाखल होत जमावाची समजूत काढली. त्यानंतर शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरा प्रकार २२ जानेवारी रोजी घडला.

(हेही वाचा – Raj Thackeray: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा – राज ठाकरे )

अयोध्या येथील राममंदिराच्या लोकार्पणाचे निमित्त साधून कर्जत तालुक्यातील नेरळ येथे पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक सुरू असताना मयूर लीये या तरुणाने एका मुस्लिमधर्मीय व्यक्तीच्या दुकानावर झेंडा लावत व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याखाली आक्षेपार्ह मजकूर लिहिला. त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.