• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
30 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Monday, September 21, 2026
Facebook
Instagram
X
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home क्राईम पोस्ट मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी : NSE इमारतीत RDX आणि IED लावल्याचा ईमेल; BKC...
  • क्राईम पोस्ट

मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी : NSE इमारतीत RDX आणि IED लावल्याचा ईमेल; BKC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई शेअर बाजार (BSE) ला आलेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ला देखील अशाच प्रकारचा धमकीचा ईमेल प्राप्त झाला आहे

July 16, 2025
211
Facebook
X
WhatsApp
Email
    मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी : NSE इमारतीत RDX आणि IED लावल्याचा ईमेल; BKC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
    मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी : NSE इमारतीत RDX आणि IED लावल्याचा ईमेल; BKC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
    मुंबई शेअर बाजार (BSE) ला आलेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ला देखील अशाच प्रकारचा धमकीचा ईमेल प्राप्त झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईमेलमध्ये NSE च्या इमारतीमध्ये RDX आणि IED लावल्याची माहिती देण्यात आली असून स्फोट होणार असल्याचा इशारा दिला आहे. या ईमेलमध्ये “कॉम्रेड पिनराई विजयन” हे नाव वापरण्यात आले आहे. या प्रकरणी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी)
    (हेही वाचा – ULRA : शत्रू देशांचे धाबे दणाणणार ! अमेरिकेच्या बी-२१ ला टक्कर द्यायला भारत बनवतोय स्ट्रॅटजिक बॉम्बर विमान)
    ही धमकी NSE च्या अधिकृत ईमेलवर रविवारी प्राप्त झाली. ईमेलमध्ये NSE च्या सर्व इमारतींमध्ये स्फोटके लावल्याचा दावा करण्यात आला होता आणि स्फोट लवकरच होईल, असा इशाराही देण्यात आला होता. NSE चे वरिष्ठ व्यवस्थापक कौशल कुमार यांच्या तक्रारीवरून BKC पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 125, 353(1)(b), 351(3) आणि 351(4) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.(मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी)
    (हेही वाचा – Crime News : ड्रग्सच्या पैशांच्या वादातून आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाचे अपहरण; ४ जणांना अटक, ड्रग्स माफियाची कानपूर मधून सुटका)
    पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले आहे की BSE आणि NSE या दोन्ही संस्थांना एकाच Outlook ईमेल आयडीवरून एकाच वेळी धमकी मिळाली होती. ही भीती आणि गोंधळ पसरविण्याची खोडसाळ हरकत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून सध्या ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.(मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी)
    BSE ला देखील धमकी
    यापूर्वी मुंबईतील BSEच्या फिरोज टॉवरला देखील बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. अधिकृत BSE ईमेल आयडी आणि CEO यांच्या ईमेलवर असा ईमेल पाठवण्यात आला होता. “पिनराई विजयन” या नावाने साइन केलेल्या या ईमेलमध्ये चार IED स्फोटके आणि RDX फिरोज टॉवरमध्ये लावल्याचे नमूद होते आणि स्फोट दुपारी ३ वाजता होईल, असा इशारा देण्यात आला होता.(मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी)
    (हेही वाचा – World Snake Day : जागतिक सर्प दिनानिमित्त सापांबद्दल ‘या’ महत्त्वाच्या आणि रहस्यमयी गोष्टी जाणून घेऊया)
    धमकीचा ईमेल मिळताच BSE प्रशासनाने तातडीने पोलिसांना कळवले. बॉम्ब शोध व निकामी पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण इमारतीत तपासणी करण्यात आली. मात्र, तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.(मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी)
    या प्रकरणी बीएसईचे सहाय्यक व्यवस्थापक सुजित जाधव यांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, यासंदर्भातही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • BKC
    • BKC police station
    • Bomb blast threat in Mumbai
    • Mumbai Stock Market
    • National Stock Exchange
    • NSE
    • NSE building
    • RDX and IED
    • Threat on NSE's official email
    Facebook
    X
    WhatsApp
    Email
      Previous articleRaj Thackeray-Uddhav Thackeray : युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का?; राज ठाकरेंच्या पोस्टमध्ये नेमके काय ?
      Next articleयुक्रेनवरील हल्ले थांबविण्याकरिता Donald Trump यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’; “रशियासोबत व्यापार केला तर…”
      sakshi.ajay

      Latest News

      • Thane : ठाणेकरांचा रोजचा त्रास संपणार? रेल्वे स्थानकात पहिल्या Prepaid Rickshaw सेवेचा शुभारंभ September 21, 2026
      • El Nino अधिक तीव्र झाल्याने बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाचा धोका, प्रशासन सतर्क; तज्ज्ञांचे मत काय? September 21, 2026
      • Apple Foldable iPhone : भारतीयांमध्ये फोल्डिंग आयफोनची एवढी क्रेझ का? रेग्युलर आयफोनपेक्षा काय आहे खास? September 21, 2026
      • Trump Xi Jinping Trade Deal : ट्रम्प यांचा चीनबाबत अचानक बदलला सूर; टॅरिफच्या दबावाखाली ‘सीक्रेट डील’चा प्लॅन? September 21, 2026
      • India vs Japan T20I 2026 : भारताविरुद्धचा सामना जपानच्या क्रिकेटसाठी ठरणार टर्निंग पॉइंट, बेसबॉलच्या देशात क्रिकेटची नवीन इनिंग September 21, 2026
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • Thane : ठाणेकरांचा रोजचा त्रास संपणार? रेल्वे स्थानकात पहिल्या Prepaid Rickshaw सेवेचा शुभारंभ September 21, 2026
      • El Nino अधिक तीव्र झाल्याने बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाचा धोका, प्रशासन सतर्क; तज्ज्ञांचे मत काय? September 21, 2026
      • Apple Foldable iPhone : भारतीयांमध्ये फोल्डिंग आयफोनची एवढी क्रेझ का? रेग्युलर आयफोनपेक्षा काय आहे खास? September 21, 2026
      • Trump Xi Jinping Trade Deal : ट्रम्प यांचा चीनबाबत अचानक बदलला सूर; टॅरिफच्या दबावाखाली ‘सीक्रेट डील’चा प्लॅन? September 21, 2026
      • India vs Japan T20I 2026 : भारताविरुद्धचा सामना जपानच्या क्रिकेटसाठी ठरणार टर्निंग पॉइंट, बेसबॉलच्या देशात क्रिकेटची नवीन इनिंग September 21, 2026
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline