Bicycle Thief : मुंबईतील सायकलचोर अटकेत; २५ गुन्ह्यांची उकल

रईस खान याने चोरलेल्या सायकल कोळीवाडा येथील सायकल दुकानदार उगमलाल याला विकल्याची कबुली दिली. कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कोळीवाडा येथून उगमलाल याला ताब्यात घेतले.

356
CBI : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ८ जणांना CBI कडून अटक

रस्त्यावर किंवा सोसायटीच्या आवरात पार्क करण्यात आलेल्या महागड्या सायकलींची चोरी करणाऱ्या एका सराईत सायकल चोरासह (Bicycle Thief) दोन जणांना मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या चौकशीत जवळपास २५ सायकली चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. (Bicycle Thief)

रईस तावर खान (४७) आणि उगमलाल बाबुराव गौड उर्फ हुकूम (४२) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. रईस हा सायकल चोर (Bicycle Thief) असून माहीम नया नगर येथे राहणारा आहे. तर उगमलाल हा अंटोप हिल कोळीवाडा येथे राहणारा असून चोरीच्या सायकली विकत घेऊन त्या इतरांना विकत असे उगमलालचे कोळीवाडा येथे सायकलचे दुकान आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Bicycle Thief)

(हेही वाचा – Maratha Reservation : महाराष्ट्रात सध्या किती टक्के आरक्षण आहे? किती वाढू शकते?)

या ठिकाणांहूनही सायकल चोरीचे गुन्हे दाखल 

आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बकरी अड्डा येथून गेल्या आठवड्यात एक महागडी सायकल चोरीला (Bicycle Thief) गेली होती. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज वरून रईस खान या सायकल चोराला (Bicycle Thief) ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (Bicycle Thief)

रईस खान याने चोरलेल्या सायकल कोळीवाडा येथील सायकल दुकानदार उगमलाल याला विकल्याची कबुली दिली. कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कोळीवाडा येथून उगमलाल याला ताब्यात घेतले. रईस खानच्या चौकशीत त्याने वर्षभरात बोरिवली, विलेपार्ले, जोगेश्वरी, माहीम, आग्रीपाडा आणि दक्षिण मुंबईतही जवळपास २५ सायकल चोरीचे (Bicycle Thief) गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या रईस आणि उगमलाल या दोघांना पुढील तपासासाठी आग्रीपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास आग्रीपाडा पोलिस ठाणे करीत आहे. (Bicycle Thief)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.