Bhiwandi मध्ये शोरमा खाणं बेतलं जीवावर; विषबाधा झालेल्यांची संख्या ३७ पार, रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता

74
चिकन शोरमा आणि पिझ्झा, अन्न विषबाधा संदर्भात.
भिवंडीमध्ये शोरमा खाल्ल्याने विषबाधा झाली.

मुंबईच्या पायधुनी भागात विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. अशीच घटना भिवंडी शहरात घडली आहे. भिवंडीतील खांडूपाडा परिसरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ६ सदस्यांसह एकूण १४ जणांना अन्नातून विषबाधा (food poisoning) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरुवातीला १४ जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता हा आकडा तब्बल ३७ वर पोहोचला असून रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाधित रुग्णांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने, त्यांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.  (Bhiwandi)

(हेही वाचा –  Pune: मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे प्रवेश सुरू, विद्यार्थिनींना ‘या’ संधींचा लाभ घेण्याचे आवाहन)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकांनी खांडूपाडा (Bhiwandi Khandupada) परिसरातील ‘फेमस शोरमा’ (Famous Shawarma) नावाच्या दुकानातून चिकन शाओर्मा आणि पिझ्झा खरेदी करून गुरुवारी १८ जूनला रात्री घरी नेऊन खाल्ला होता. त्यानंतर  शुक्रवारी सकाळपासूनच काहींना अस्वस्थ वाटू लागले. तसेच दुपारपर्यंत हा त्रास अधिक वाढल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्या रुग्णांना उलट्या, पोटदुखी, मळमळ, जुलाब आणि अशक्तपणा अशी लक्षणे जाणवत होती. रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार ही अन्नातून विषबाधा असल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस तातडीने रुग्णालयात आणि घटनास्थळी दाखल झाले. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून तपास सुरू करण्यात आला असून, संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने (सॅम्पल्स) लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शांतीनगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

(हेही वाचा –  Fuel Shortage : जनतेची ‘लूट’ थांबणार! इंधनाची साठेबाजी करणाऱ्यांवर केंद्र आणि राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर)

शोरमा विक्रेत्यावर एफडीएची कारवाई

घटनेची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने संबंधित शोरमा विक्रेत्यावर रात्रीच धडक कारवाई केली. दुकानातील अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विषबाधेचे नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.