-
प्रतिनिधी
अंबरनाथमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जितेंद्र पवारने ठाणे पोलिसांना सोशल मीडियावर चॅलेंज दिले आहे. “मला पकडणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस,” अशी पोस्ट फेसबुक टाकून पोलिसांना चॅलेंज केले आहे. तसेच त्याने दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी स्वतःला ‘टायगर भाई’ असे म्हटले असून त्यांने स्वतः च्या गुन्हेगारीचा पूर्व इतिहास फेसबुक पोय्टवर टाकला आहे. (Crime)
(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानी उत्पादनांवर बंदी घाला; शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी)
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील बांधकाम व्यवसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या सीताई सदन कार्यालयावर सोमवारी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी गोळीबार करून पळ काढला होता. या हल्ल्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी जितेंद्र पवार हा अद्याप फरार आहे. त्याचा कसून शोध घेतला असला तरी जितेंद्र पवार या संशयित आरोपीने स्वतः च्या फेसबुक पेजवर पोलिसांना चॅलेंज केले आहे. (Crime)
(हेही वाचा – CC Road : काँक्रिटच्या रस्त्यांवरील सांधे भरण्यासाठी डांबर भरण्याचा पर्याय अयशस्वी; अतिरिक्त आयुक्तांनी दिले ‘हे’ निर्देश)
पवार याने पहिल्या पोस्टमध्ये लिहले आहे की, मला पकडणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस,” दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी स्वतःला ‘टायगर भाई’ असे म्हटले आहे, तसेच स्वतःवर असलेल्या गुन्ह्याचा इतिहास त्याने फेसबुकवर टाकला आहे, आरोपी पवार याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे स्थानिकामध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. हे मेसेज जितेंद्र पवारच्या फेसबुक अकाउंटवरून आले असल्याची पुष्टी झाली आहे. आम्ही त्याला शोधण्यासाठी आणि अटक करण्यासाठी चार विशेष पथके तैनात केली आहेत,” असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले. पवार यांच्यावर अलिकडच्या काळात झालेल्या हल्ल्याच्या घटनांचा रेकॉर्ड असला तरी, तो यापूर्वी अटक टाळण्यात यशस्वी झाला होता. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community