MCOCA Act : गँगस्टर इलियास बचकानासह ७ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई

बचकाना हा पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्याने एका बांधकाम व्यवसायिकाचे अपहरण करून सुटकेसाठी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. गुन्हे शाखेच्या कक्ष ३ च्या पथकाने बांधकाम व्यवसायिकाची मानखुर्द येथील एका झोपड्यातून सुटका करून बचकानासह त्याच्या इतर साथीदाराना अटक करण्यात आली होती.

164
MCOCA Act : गँगस्टर इलियास बचकानासह ७ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई
MCOCA Act : गँगस्टर इलियास बचकानासह ७ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई

गँगस्टर मोहम्मद इलियास उर्फ बचकानासह ७ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लावण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून (Mumbai Crime Branch) मोक्का (MCOCA Act) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बचकाना हा पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्याने एका बांधकाम व्यवसायिकाचे अपहरण करून सुटकेसाठी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. गुन्हे शाखेच्या कक्ष ३ च्या पथकाने बांधकाम व्यवसायिकाची मानखुर्द येथील एका झोपड्यातून सुटका करून बचकानासह त्याच्या इतर साथीदाराना अटक करण्यात आली होती. दक्षिण मुंबईतील बांधकाम व्यावसायिक हिफजुर रहमान अन्सारी यांचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा आरोप बचकाना आणि त्याच्या साथीदारावर आहे. गुन्हेगारी इतिहास असलेला बचकाना याच्याविरुद्ध मुंबईत तीन डझनहून अधिक दरोडे आणि मारहाणीच्या गुन्हे दाखल आहेत. (MCOCA Act)

बांधकाम व्यवसायिकाच्या अपहरणाच्या गुन्ह्यात नौशाद शेख (२६), वाजिद यासीन शेख (४३), करीम वाजिद खान (४१), आलमगीर अलिमुद्दीन मलिक (३७) आणि मजहर शाखिर उर्फ ​​सानू शाह यांचा समावेश आहे. सातवा आरोपी शफीक शोकीन शाह हा फरार आहे. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी या प्रकरणात मोक्का तरतुदींचा वापर करण्यास मान्यता दिली आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली. “आम्ही संबंधित न्यायालयात जाणार असून, न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे संबंधित कारागृहातून आरोपीचा पुन्हा ताबा घेण्यात येईल, मोक्का कायदा (MCOCA Act) अंतर्गत त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.” असे राजतिलक रोशन यांनी म्हटले आहे. (MCOCA Act)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : जागावाटपावरून उबाठा-काँग्रेसमध्ये घमासान)

सहाही आरोपी न्यायालयीन कोठडीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यवसायिक अन्सारी याचे २३ नोव्हेंबर रोजी माझगाव सर्कल येथून अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्याच्या कुटुंबीयांकडून १० कोटींची खंडणी मागितली आणि अपहरणामागील मास्टरमाईंड बचकाना असल्याचे समोर आले. खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे कक्ष ३ च्या पथकाने अन्सारीचा मानखुर्दमधील मंडाळा भागात शोध घेऊन तेथून त्याची सुटका करण्यात आली. अन्सारी याला एका खोलीत बंदिस्त करून त्याचे हातपाय दोरीने बांधून त्याला मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी बचकाना आणि नौशाद शेख यांना अटक केली, तर इतर तीन संशयितांना २४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३६४(ए) (अपहरण किंवा खंडणीसाठी अपहरण), ३८४ (खंडणी) आणि १२०(बी) (गुन्हेगारी कट) अंतर्गत आरोप आहेत. (MCOCA Act)

गुन्हे शाखेने पीडितेचा शोध सुरू केला आणि तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की, व्यवसायिक अन्सारी आणि आरोपी दोघांवर २०२१ मध्ये भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अन्सारीने बचकाना याला एकाच्या हत्येची सुपारी दिली होती, बचकाना याने त्या व्यक्तीवर हल्ला केला होता, सदर व्यक्ती मृत झाल्याचे समजून बचकाना आणि त्याचे सहकारी तेथून पळून गेले होते. ज्याच्यावर हल्ला झाला तो जिवंत होता व त्याने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. एका पोलिस पथकाने इंदूरला भेट दिली जिथे बचकानाचे कुटुंब राहत होते आणि त्यांच्याकडून चार मोबाईल फोन जप्त केले. दुसऱ्या पथकाने आरोपी मजहर शाह याचा मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात शोध घेऊन त्याला मुंबईत आणले. अटक करण्यात आलेले सहाही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. (MCOCA Act)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.