जयपुर मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरण, आरोपी चेतन सिंह हा वलसाडला कोणाला भेटणार होता?

जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात वेगवेगळी कारणे समोर येत आहेत

95
जयपुर मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरण, आरोपी चेतन सिंह हा वलसाडला कोणाला भेटणार होता?
जयपुर मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरण, आरोपी चेतन सिंह हा वलसाडला कोणाला भेटणार होता?

जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. त्यातील एक कारण म्हणजे आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंह याला वलसाड रेल्वे स्थानकावर उतरायचे होते. परंतु, त्याला त्याचे वरिष्ठ टिकाराम मीना यांनी उतरु दिले नाही म्हणून तो संतापला होता आणि या संतापाच्या भरात त्याने गोळीबार करून टिकाराम मीनासह तीन प्रवाशांना ठार केले. मात्र, त्याला वलसाड का उतरायचे होते? कोण त्याची वाट पहात होते का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सूत्राच्या म्हणण्यानुसार, वलसाड येथे चेतन सिंह याचे ओळखीचे कोणीही नाही. त्याला वलसाडलाच का उतरायचे होते, हे स्पष्ट झालेले नसले तरी नक्कीच वलसाडमध्ये त्याची कोणीतरी वाट पहात असेल, त्यामुळे तो ड्युटी सोडून वलसाड येथे उतरण्यासाठी हट्ट करीत असावा याबाबत तपास सुरू असून, या दरम्यान त्याचे कोणाशी बोलणे अथवा चॅटिंग झाले का हे तपासण्यात येणार असून त्याचा मोबाईल फोन ताब्यात घेत तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात येणार आहे, असे एका अधिकाऱ्यानी सांगितले.

चेतन सिंह याच्या सहकाऱ्यांनी पोलीस जबाबात काय म्हटले?

जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये स्कॉटिंग ड्युटीवर असणारा आरपीएफ जवान चेतन सिंह वलसाडला येण्यापूर्वी अचानक तब्येत बिघडल्याचे कारण देत वलसाड येथे मला उतरू द्या, असा हट्ट वरिष्ठ सहकारी टिकाराम मीना यांच्याकडे केला होता. वलसाड गेल्यानंतर त्याने सहकारी मीना आणि इतर तीन प्रवाशांवर गोळीबार करून ठार केले. चेतन सिंह याला वलसाड का उतरायचे होते, तेथे तो कोणाला भेटणार होता? याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पोलीस या अनुषंगाने देखील तपास करीत आहे. बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी आरोपी चेतन सिंह याच्या सहकाऱ्याचा जबाब नोंदवला त्यात त्याने म्हटले आहे की, एएसआय टिकाराम मिना यांनी मला सांगितले की, कॉन्स्टेबल चेतन सिंह याची तब्येत बिघडली आहे.

मी चेतन सिंह याच्या अंगाला हात लाऊन त्याला ताप आहे का हे तपासले, त्याचे अंग तापलेले नव्हते. परंतु, चेतन सिंह याने आपली तब्येत ठीक नसून मला वलसाड येथे उतरून द्यावे, असे टिकाराम मिना यांना सांगत होता. मिना यांनी त्यास समजावले की, दोन तीन तासांची ड्युटी बाकी आहे, गाडी मुंबईला पोहचल्यानंतर आराम कर. परंतु, चेतन सिंह ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. म्हणुन मिना यांनी निरीक्षक हरिश्चंद्र यांना मोबाईल वर संपर्क साधला. त्यांनी मुंबई सेंट्रल नियंत्रण कक्षाला कळविण्यास सांगितले. मिना यांनी नियंत्रण कक्षाला संपर्क साधला असता तेथिल अधिकाऱ्यांनी सांगितले की, चेतन सिंह यास समजावुन सांगा व थोडीशी ड्युटी शिल्लक आहे. ती संपल्यावर मुंबईत जाऊन औषध उपचार करण्यास किंवा आराम करण्यास त्याला सांगा असे कळविले.

त्यानुसार मिना यांनी चेतन सिंह यास समजावले, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने मला नियंत्रण कक्षाशी बोलायचे आहे असे सांगून असिस्टन्ट सिक्युरीटी कमिशन सुजित कुमार पांडे यांच्याशी बोलणे केले. त्यांनी देखील त्याला समजावले. परंतु, चेतन हा कोणाचे ऐकत नव्हता व मला वलसाडला उतरू द्या असा हट्ट करीत होता. अखेर वलसाड स्थानक गेल्यानंतर चेतन सिंह मीना यांच्याशी भांडण केले व रागाच्या भरात त्याने धावत्या ट्रेनमध्ये एएसआय मीना सह चार जणांवर रायफलमधून १२ गोळ्या झाडत करून त्यांची हत्या केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.