Murder : दारूच्या नशेत पतीने पत्नीसह दोन मुलींना जाळून केले ठार 

245

राज्यात सर्वत्र धुळवडीचा आनंद साजरा होत असताना मात्र अहमदनगर शहरापासून काही अंतरावर असलेल्या पिंपळगाव लांडगा या गाव हादरून गेले. चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीसह दोन मुलींना जाळून मारल्याची (Murder) धक्कादायक घटना घडली आहे.

पत्नीचे अनैतिक संबंध?

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील लांडगे असे आरोपी पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी लीला आणि दोन मुलींना घरात कोंडले. त्यानंतर बाहेरून कुलूप लावून घरामध्ये पेट्रोल टाकत आग लावून पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारले (Murder) आहे. हा सर्व प्रकार सुनील याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून केल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा Swatantrya Veer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात ऐरोलीतील 24 वर्षीय ऐश्वर्याचाही सहभाग)

तिघींचा होरपळून मृत्यू

गावात अचानक आग लागल्याची माहिती कळताच गावातील लोकांनी धाव घेतली. आग विझवण्यासाठी सुनील याच्या घराकडे लोक सैरावैरा धावू लागले. मात्र, घराला कुलूप लावलेले असल्यामुळे ते तोडेपर्यंत लोकांना कोणतीही मदत करता आली नाही आणि घरामध्ये कोंडून टाकलेल्या पत्नी आणि दोन मुलींचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

पतीने दिली गुन्ह्याची कबुली

दरम्यान, नगर तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतलं आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुनील याने केलेल्या कृत्याची लगेचच पोलिसांना कबुली दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.