Police Officer Rape Case : गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पीडित महिलेने गुरुवारी नालासोपारा येथील आचोळे पोलीस ठाण्यात मल्हार थोरात यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.

230
Police Officer Rape Case : गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
Police Officer Rape Case : गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध एका वकील महिलेने आचोळे पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी वरून आचोळे पोलीस ठाण्यात या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्हार थोरात असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

पालघर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख असणारे मल्हार थोरात यांची ३३ वर्षीय वकील महिलेसोबत मागील तीन ते चार वर्षांपासून ओळख होती. ओळखीतून दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध झाले. पीडित महिलेने गुरुवारी नालासोपारा येथील आचोळे पोलीस ठाण्यात मल्हार थोरात यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीत केलेल्या आरोपानुसार थोरात यांनी पीडितेच्या पतीला तीचे आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवून देण्याची धमकी देऊन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. तसेच तीला तिचे विवस्त्र छायाचित्रे पाठविण्यास भाग पाडले असे आरोप पीडितेने तक्रारीत केले आहे.

(हेही वाचा – Marathwada Water Grid Project : उद्धव ठाकरेंनी वॉटर ग्रीड प्रकल्पाची हत्या केली; देवेंद्र फडणवीस)

या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात थोरात याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार), ३७६ (२) (एन) (सरकारी अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे), ३७७ (अनैसर्गिक बलात्कार), ५०६ (२) (धमकी देणे), सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलम ६६ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप आरोपी थोरात यांनी अटक करण्यात आलेली नसून अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.