Murder : नववीच्या विद्यार्थाची भोसकून हत्या, १९ वर्षीय तरुणाला अटक

सोमवारी पहाटे ऋषिकेशला गुन्हे शाखेने दिव्यातून अटक करून घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिले.

223
Murder : मानखुर्दमधील तरुणीची हत्या, टॅक्सी चालक निजामुद्दीन अलीला अटक

एकाच मुलीवर प्रेम करणाऱ्या दोन मुलांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घाटकोपर पश्चिम येथे रविवारी रात्री घडली. या घटनेनंतर पळून गेलेल्या हल्लेखोराला गुन्हे शाखा कक्ष ७च्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील दिवा येथून अटक केली आहे. या घटनेत मृत झालेल्याचे वय अवघे १६ वर्षे असून हत्या करणारा हा १९ वर्षांचा आहे. (Murder)

श्रवण गणेश साळवे (१६) असे मृताचे नाव आहे, श्रवण हा विक्रोळी पश्चिम येथील सूर्यनगर येथे कुटुंबियासह राहण्यास होता. अटक करण्यात आलेला आरोपी ऋषिकेश गुरव (१९) हा सध्या ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे कुटुंबियासह राहण्यास आहे. पूर्वी तो घाटकोपर पश्चिम गोळीबार रोड येथे राहण्यास होता. काही वर्षांपूर्वी त्याचे कुटुंब दिवा येथे राहण्यास गेले होते. ऋषिकेश यांचे घाटकोपर येथे राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते, त्या नंतर या मुलीने ऋषिकेशला सोडून १६ वर्षीय श्रवण याच्यासोबत मैत्री केली होती. ऋषिकेशला मात्र हे खटकत होते, यावरून दोघांत अनेक वेळा वाद झाला होता. (Murder)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सांगलीत होणार तिहेरी लढत; विशाल पाटील यांची निवडणुकीतून माघार नाहीच)

रविवारी रात्री ऋषिकेश हा घाटकोपर येथे आला व त्याने श्रवणला गोळीबार येथे बोलावून घेतले, त्या ठिकाणी दोघांत वाद होऊन ऋषिकेशने सोबत आणलेल्या तीक्ष्ण हत्याराने श्रवणवर वार करून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या श्रवणला स्थानिकांनी राजावाडी रुग्णालयात आणले असता उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी ऋषिकेश विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हेशाखा कक्ष ७ पथक ऋषिकेशच्या मागावर होते. सोमवारी पहाटे ऋषिकेशला गुन्हे शाखेने दिव्यातून अटक करून घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिले. (Murder)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.