केंद्रीय जीएसटी उपायुक्त (IRS officer) प्रभा भंडारी (Prabha Bhandari) यांना झाशी येथे अटक करण्यात आली आहे. यामध्ये सीबीआयने दोन जीएसटी अधीक्षकांना एकूण ७० लाख रुपयांची लाच घेताना पकडले आहे. प्रभा भंडारी यांच्याकडून रोख रक्कम, सोने, चांदी आणि मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. जीएसटी चोरीच्या प्रकरणात कंपनीकडून १.५ कोटी रुपयांची लाच (Bribe IRS official) मागितली गेली होती. याच काळात ही अटक करण्यात आली. (IRS Prabha Bhandari)
मिळालेल्या माहितीनुसार उपायुक्त प्रभा भंडारी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय जीएसटी पथकाने (Central GST Team) झोकना बाग येथील जय दुर्गा हार्डवेअर फर्मवर छापा टाकला. या दरम्यान अनेक अनियमितता आढळून आल्या. एकूण १३ कोटी रुपयांची वसुली सुरू होती. या प्रकरणात १.५ कोटी रुपयांचा करार झाला.
(हेही वाचा – Elon Musk ला भारताचा दणका! एक्सच्या ‘या’ कारनाम्यामुळे दिला ७२ तासांचा अल्टिमेटम!)
फोनवरून जीएसटी उपायुक्तांना अटक
करारानुसार, पहिला हप्ता म्हणून प्रभा भंडारी यांना ७० लाख रुपये देण्यात आले. ही संपूर्ण रक्कम यापूर्वी अनिल नावाच्या एका सहकारी अधिकाऱ्याकडे पोहोचली होती. संपूर्ण पैसे विल्हेवाट लावण्यापूर्वीच, सीबीआयचे संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून होते. अनिलने पैसे आल्यावर, सीबीआयने प्रभा भंडारी यांना फोन करून सांगितले की, “मॅडम, पार्टीकडून ७० लाख रुपये आले आहेत.”
प्रभा यांनी लगेचच कॉलला प्रतिसाद दिला, “छान. ते पैसे सोन्याच्या बिस्किटमध्ये रूपांतरित करा आणि मला द्या.” या कॉलनंतर, सीबीआयने कारवाई केली. प्रभा भंडारी त्यावेळी दिल्लीत होत्या आणि काही तासांतच सीबीआयच्या पथकाने त्यांना अटक केली आणि झाशीहून दिल्लीला आणले. तसेच सीबीआयने प्रभा भंडारी यांच्या दिल्लीतील फ्लॅटवर तसेच झाशी, ग्वाल्हेर आणि इतर ठिकाणी छापे टाकले. सुमारे चार तास चाललेल्या या शोध मोहिमेत ही मालमत्ता जप्त करण्यात आली.
(हेही वाचा – Thane Crime : आंबिवलीतील सराईत इराणी टोळीमधील दोन चोरट्यांना अटक; ५२ गुन्ह्यांची उकल)
प्रभा भंडारी कोण आहेत?
सीबीआयने प्रभा भंडारी यांना अटक केली आहे. त्या २०१६ च्या बॅचच्या आयआरएस अधिकारी आहेत. उपायुक्त आयआरएस प्रभा भंडारी यांची ६ महिन्यांपूर्वीच नियुक्ती झाली होती. अवघ्या ६ महिन्यांतच प्रभारींनी झाशीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे. यासोबतच त्यांनी इतर अनेक मौल्यवान वस्तू देखील खरेदी केल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

