164 Cr. Extortion case : ईडीची भीती दाखवून १६४ कोटींची खंडणी मागितली, ६ जणांना अटक

610
164 Cr. Extortion case : ईडीची भीती दाखवून १६४ कोटींची खंडणी मागितली, ६ जणांना अटक
164 Cr. Extortion case : ईडीची भीती दाखवून १६४ कोटींची खंडणी मागितली, ६ जणांना अटक

पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून खंडण्या उकळणाऱ्या टोळ्यांनी आता ईडीच्या (ED) नावाचा वापर करून खंडण्या (Extortion) उकळण्यास सुरुवात केली आहे. रियल इस्टेट व्यवसायात असणाऱ्या एका टोळीने मुंबईतील एका बड्या बांधकाम व्यवसायिकाला ईडी (ED) मध्ये गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन चक्क १६४ कोटी रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा (Mumbai crime branch) कक्ष ९ पथकाने या प्रकरणी ६ जणांना अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या प्रथम खबरी अहवाल (FIR) च्या आधारावर अंमलबजावणी संचालनालय (ED) ने शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी (ECIR) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

(हेही वाचा – Prakash Ambedkar : इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे थेट वक्तव्य)

६ जणांना अटक

मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ३१ जानेवारी रोजी या प्रकरणात अवनिष दुबे (वय ४६), राजेंद्र शिरसाठ (वय ५९), राकेश केडीया (वय ५६), कल्पेश भोसले (वय ५०), अमेय सावेकर (वय ३८) आणि हिरेन भगत उर्फ रोमि भगत (वय ५०) या ६ जणांना अटक केली आहे. बोरिवली, दहिसर,मालाड, कांदिवली,खार आणि चेंबुर परिसरात राहणारी ही टोळी रियल इस्टेटच्या व्यवसायात आहे.

ईडीची भीती दाखवून फसवले

या टोळीतील मुख्य आरोपी अवनिष दुबे याने मुंबईतील बांधकाम व्यवसायिक ओंकार डेव्हलपर (Omkar developers) विरुद्ध मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत (EOW) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे ईडी या प्रकरणात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगून घाबरवून प्रकरण मिटविण्यासाठी नरिमन पॉईंट येथे एका कॉफी शॉपमध्ये बांधकाम व्यवसायिकाला बोलावण्यात आले होते.

(हेही वाचा – Bmc budget 2024 -25 education: महापालिका शिक्षण विभागासाठी यंदा केवळ १५० कोटींचाच अधिक निधी)

मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा

त्या ठिकाणी ईडीचे अधिकारी म्हणून दोन जणांची ओळख करून प्रकरण मिटविण्यासाठी १६४ कोटींची (164 CR) मागणी करण्यात आली होती. व्यावसायिकाने २५ लाख रुपये रोमि भगत याला दिले होते. हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे येताच हे प्रकरण तपासासाठी युनिट ९ (Unit 9) कडे देण्यात आले. गुन्हे शाखा युनिट ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक (Daya Nayak)यांनी व्यवसायिकाला घेऊन वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

३१ जानेवारी रोजी गुन्हे शाखेने सहा ही आरोपींना अटक केली. या प्रकरणात ईडीच्या (ED)काही अधिकारी यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणी हे प्रकरण ईडीने या प्रकरणात उडी घेऊन ईडीने या प्रकरणी ईसीआयआर(ECIR) नोंदवून तपास सुरू केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.