Bareilly Violence Case : ‘सर तन से जुदा’ ही घोषणा म्हणजे देशद्रोही बंड

9
Bareilly Violence Case
Bareilly Violence Case
  • जयेश मेस्त्री

Bareilly Violence Case : बरेली हिंसा प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचा निकाल दिला आहे. आपल्याकडे स्वयंघोषित पुरोगामी ‘जय श्रीराम’ या प्रभू रामांच्या भक्तिमय घोषणेवर टिका करतात. या दिमागी नक्षलींच्या मते राम राम म्हणणं योग्य आहे. पण जय श्रीराम म्हणणं अयोग्य आहे. जय श्रीराम म्हणजे, रामाचा जय असो. ह्यात पुरोगाम्यांच्या अवघड जागी का दुखावे, हे तर त्यांची अवघड जागाच सांगू शकेल. असो. मात्र आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने या सर्व पुरोगाम्यांच्या कानशिलात सणसणित चपराक काढली आहे. नमूद प्रकरणात न्यायालयाने तौकीर रजा यांची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. ‘सर तन से जुदा’ या घोषणेची तुलना ‘जय श्री राम’, ‘अल्लाहू अकबर’, ‘सत श्री अकाल’ किंवा ‘हर हर महादेव’ यांसारख्या धार्मिक घोषणांशी करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

‘जय श्री राम’ रामाचा भक्तिमय जयघोष आहे. ‘हर हर महादेव’ शिवभक्तांचा आवडता मंत्र आहे. ‘अल्लाहू अकबर’ म्हणजे अल्लाह महान आहे, ‘सत श्री अकाल’ म्हणजे अमर, शाश्वत सत्याला वंदन. या धार्मिक घोषणा आहेत. असं न्यायालयाने नमूद केलं आहे. न्यायालयाचं म्हणणं आहे की या घोषणा संबंधित देव किंवा गुरु यांच्याप्रती आदर व्यक्त करणाऱ्या आहेत.

(हेही वाचा – Ajit Agarkar Snub : रोहितचं भवितव्य, लक्ष्मणशी मतभेद, आगरकर यांच्या गच्छंतीची मीमांसा )

बरेली हिंसा प्रकरण हे उत्तर प्रदेशातील बरेली येथे सप्टेंबर २०२५ मध्ये घडलेल्या हिंसक घटनांशी संबंधित आहे. माहितीनुसार, मुस्लिम समाजातील लोकांना इस्लामिया इंटर कॉलेजच्या मैदानावर एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. बंदी असतानाही सुमारे २०० ते २५० जण इस्लामिया इंटर कॉलेजच्या मैदानाकडे गेल्याचा आरोप आहे. दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेची हानी आणि पोलिसांवर हल्ल्यामुळे परिस्थिती हिंसक बनली. अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आणि अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात मौलाना तौकीर रजा खान यांना प्रमुख आरोपी असल्याचा आरोप करत अटक करण्यात आली होती. नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जाला नकार दिला. न्यायालयाने प्रकरणाच्या गांभीर्याचा उल्लेख केला आहे. तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते आणि पुढील काळात अनेक आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती विविध वृत्तांत नमूद आहे. या हिंसक घटनेवेळी, ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या.

न्यामूर्ती आशुतोष श्रीवास्तव म्हणाले की, ‘आरोपी मौलाना तौकीर रझा याने त्याचे धार्मिक आणि राजकीय हितसंबंध जपण्यासाठी हे आंदोलन केले होते. त्याने या आंदोनलनासाठी कुठलीही अनुमती घेतली नव्हती. अनुमती नसतानाही हा मोर्चा काढण्यात आला आणि पोलिसांनी तो अडवल्यावर दंगल झाली आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली. घटनेनंतर याचिकाकर्त्याने मोठ्या संख्येने हाकेला प्रतिसाद दिल्याबद्दल जनसमुदायाचे आभार मानणारे आणि त्यांच्या कृत्यांचे कौतुक करणारे भाषण करणे, या वर्तनाचे समर्थन केले जाऊ शकत नाही.’ तसेच ‘सर तन से जुदा’ म्हणजे लोकांचा शिरच्छेद करणे ही घोषणा लोकांना सशस्त्र बंडासाठी प्रवृत्त करणारी असून ती कायद्याच्या अधिकारासह भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता यांना आव्हान देणारी आहे, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे या हिंसक प्रवृत्तीला पाठिंबा देणाऱ्या लोकांना न्यायालयाने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतात लोकशाही आहे, कारण भारतात हिंदू बहुसंख्य आहेत. जर भारतात हिंदू बहुसंख्य नसते तर भारताचा पाकिस्तान झाला असता. ज्या भूभागात हिंदूंची संख्या कमी होती, तिथे पाकिस्तान उभा राहिला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अशी कृत्ये करणाऱ्यांसह अशा कृत्यास पाठिंबा देणारेही तितकेच दोषी मानून त्यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे आणि भारताच्या संविधानाचे संरक्षण केले पाहिजे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.