Ajit Agarkar Snub : रोहितचं भवितव्य, लक्ष्मणशी मतभेद, आगरकर यांच्या गच्छंतीची मीमांसा

15
Ajit Agarkar Snub
  • ऋजुता लुकतुके

Ajit Agarkar Snub : भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ या महिनाअखेरीस संपुष्टात येणार आङे. त्यांच्या अचानक गच्छंतीमागे केवळ एक कारण नसून, गेल्या काही महिन्यांतील अनेक मतभेदांची मालिका कारणीभूत ठरल्याचं दिसत आहे. माजी कर्णधार रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भवितव्यावरून निर्माण झालेला वाद, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी झालेले धोरणात्मक मतभेद आणि इंग्लंड दौऱ्यानंतरच्या बीसीसीआयच्या आढावा बैठकीला आगरकरांची अनुपस्थिती हे प्रमुख मुद्दे असल्याचं आता बोललं जातंय.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने लॉर्ड्सवरील सामन्यानंतर रोहितला एकदिवसीय संघातून पुढे न नेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, २०२७च्या विश्वचषकात खेळण्याची इच्छा असलेल्या रोहितला हा निर्णय पसंत पडला नाही. त्याने बीसीसीआयमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याशी संपर्क साधल्यानंतर बोर्डाने आगरकरांना सावध भूमिका घेण्यास सांगितल्याचा दावा बीसीसीआयमध्येच आतल्या गोटात केला जात आहे.

(हेही वाचा – BMW Accident Case : कोस्टल रोड अपघातातील BMW वर यापूर्वीही गुन्हा; मात्र FIR वेबसाईटवरुन गायब? )

याच काळात आगरकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यातही काही धोरणात्मक मुद्द्यांवर मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंच्या व्यवस्थापनापासून ‘भारत अ’ संघाच्या सामन्यांच्या वेळापत्रकापर्यंत अनेक बाबींवर दोघांचे मत वेगळे होते, असा दावा करण्यात आला आहे. भारत अ संघाच्या मालिकांचे वेळापत्रक आणि देशांतर्गत स्पर्धांशी होणारा संघर्ष हाही या मतभेदांचा भाग असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, इंग्लंड दौऱ्यातील कामगिरीनंतर ३ सप्टेंबरला झालेल्या बीसीसीआयच्या आढावा बैठकीला आगरकर उपस्थित राहिले नव्हते. ते शहराबाहेर असल्याने प्रत्यक्ष बैठकीला येऊ शकले नाहीत आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणीमुळे ऑनलाइनही सहभागी होता आले नाही, असे बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले होते. मात्र, पीटीआयच्या अहवालानुसार, या अनुपस्थितीमुळे आधीच ताणलेल्या संबंधांमध्ये आणखी भर पडली.

आगरकर यांनी २०२३ मध्ये निवड समिती प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात भारताने २०२४चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ची चॅम्पियन्स करंडक जिंकला. आता बीसीसीआय नव्या प्रमुखाच्या शोधात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.