BMW Accident Case : कोस्टल रोड अपघातातील BMW वर यापूर्वीही गुन्हा; मात्र FIR वेबसाईटवरुन गायब?

BMW Accident Case : कोस्टल रोड अपघातातील BMW वर यापूर्वीही गुन्हा; मात्र FIR वेबसाईटवरुन गायब?

29
BMW Case Update: Mumbai Coastal Road Crash BMW Had Earlier FIR Filed in March 2026
BMW Case Update: Mumbai Coastal Road Crash BMW Had Earlier FIR Filed in March 2026

BMW Accident Case Update : मुंबईच्या कोस्टल रोडवर भीषण अपघात झालेल्या BMW कारविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. DD-01-C-6302 क्रमांकाच्या या BMW कारविरोधात मार्चमध्ये गावदेवी पोलिस ठाण्यात भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, संबंधित प्रकरणाची FIR महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

ओमकार शिर्केंच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्चला ब्रीच कँडी हॉस्पिटलजवळ ही BMW धोकादायक पद्धतीने चालवली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. ताडदेव येथील रहिवासी ओमकार राकेश शिर्के यांनी याबाबत गावदेवी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर २९ मार्च रोजी पोलिसांनी BNS कलम 281 आणि 125 तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी वाहनचालक म्हणून शनय फाल्गुन गज्जर याची ओळख पटवण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी त्याला BNSS कलम 35(3) अंतर्गत नोटीस बजावली होती.

व्हिडिओ आला समोर 

तक्रारीनुसार, ओमकार शिर्के हे आपल्या घरी जात असताना संबंधित BMW त्यांच्या वाहनाजवळून धोकादायक पद्धतीने गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हीच कार महालक्ष्मी मंदिर परिसरात उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिर्के यांनी चालकाला जाब विचारला असता त्याने समाधानकारक उत्तर न देता तेथून निघून गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या घटनेशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही समोर आला आहे. दरम्यान, याच क्रमांकाच्या BMW चा २० सप्टेंबरला मुंबईच्या कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला. मरीन ड्राइव्हहून हाजी अलीच्या दिशेने जात असताना लाला कॉलेज आणि लोटस जेट्टीजवळ कारचा बॅरियरला धडकून अपघात झाला आणि BMW पुलावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. या प्रकरणाचा तपास ताडदेव पोलिसांकडून सुरू आहे.

आधीही गुन्हा मात्र गुन्ह्याची नोंद नाही

पोलिसांनी त्यावेळी BNSS कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावली खरी, मात्र अधिकृत महाराष्ट्र पोलिसांच्या संकेत स्थळावर या गुन्ह्यांची अधिकृत FIR अपलोड केलेला नाही. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा आणि त्याच्या नंतरच्या गुन्ह्यांचा FIR च्या मागचे आणि पुढचे सर्व गुन्ह्यांचा FIR पोलिसांकडून अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केला आहे. यावरून याच गुन्ह्याचा प्रथम खबर अहवाल FIR पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर का नाही अपलोड करण्यात आला? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. त्याच वेळी हे प्रकरण कुठेही बाहेर येऊ नये यासाठी काही प्रयत्न झाले का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.