Mumbai News : जोगेश्वरी पूर्व येथे कृत्रिम तलावात विजेचा धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

13
Mumbai News
Mumbai News

Mumbai News : जोगेश्वरी पूर्व येथील श्याम नगर तलावाजवळ उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात उतरलेल्या एका कंत्राटी कामगाराचा विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज, रविवारी घडली. रोहित भिमु राठोड (वय १९) असे या मृत कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पूर्वेकडील लिली व्हाईट इमारतीजवळील श्याम नगर तलाव परिसरात महापालिकेच्या ‘के/उत्तर’ प्रभागातर्फे मूर्ती विसर्जनासाठी पाच कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. त्यापैकी चार तलाव मध्यरात्रीनंतर बंद करण्यात आले होते. आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास कंत्राटदाराचा कामगार असलेला रोहित हा मूर्ती विसर्जनासाठी बंद करण्यात आलेल्या एका कृत्रिम तलावात उतरला असता त्याला अचानक विजेचा जोरदार झटका बसला.

(हेही वाचा – SIR Notice : निवडणूक आयोगाकडून लालकृष्ण अडवाणी, एस. जयशंकर अन् निवडणूक आयुक्तांनाच नोटीस; नेमकं कारण काय? )

या दुर्घटनेनंतर रोहितला तात्काळ जवळच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले, अशी माहिती मेघवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खाडे यांनी दिली.

या तलावात वीजप्रवाह कसा उतरला आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याचा अधिक तपास मेघवाडी पोलीस करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.