Muslim : कर्नाटकात मुसलमानांच्या विरोधामुळे श्री गणेशमूती विसर्जन मिरवणुकीचा मार्ग बदलला

कोरवार ओणी येथे मिरवणुकीला इस्लाम  (Muslim)   पेटेतून जाण्यापासून मुसलमानांनी रोखले आणि गेल्या वर्षी ज्या मार्गाने मिरवणूक गेली होती, त्याच मार्गाने जाण्याचा आग्रह धरत ते रस्त्यावर बसले.

13
विजयनगर जिल्ह्यातील हूविनहडगली शहरातील इस्लाम (Muslim) पेटे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीला १८ सप्टेंबरच्या रात्री मुसलमानांनी विरोध केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर हिंदूंना विसर्जनाचा मार्ग बदलावा लागला.
कोरवार ओणी येथे मिरवणुकीला इस्लाम  (Muslim)   पेटेतून जाण्यापासून मुसलमानांनी रोखले आणि गेल्या वर्षी ज्या मार्गाने मिरवणूक गेली होती, त्याच मार्गाने जाण्याचा आग्रह धरत ते रस्त्यावर बसले. हिंदु तरुणांनी अनेक वर्षांपासून ज्या मार्गाने मिरवणूक जाते, त्याच मार्गाने ती पुढे नेण्याचा आग्रह धरला. गेल्या वर्षी ईद-ए-मिलाद असल्यामुळे मार्ग बदलला होता. ‘या वेळी मात्र पूर्वीप्रमाणेच याच रस्त्यावरून मिरवणूक जाईल’, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा चीनही ‘मेड इन इंडिया’च्या मोहात; पाच महिन्यांत China ने किती केली खरेदी?)

पोलीस आणि भाजपचे आमदार यांच्या दबावामुळे हिंदूंची माघार

भाजपचे आमदार कृष्ण नायक घटनास्थळी पोचले आणि पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मिरवणुकीतील तरुणांशी चर्चा केली.‘या वेळी गेल्या वर्षी ज्या मार्गाने गेले होते त्याच मार्गाने जा. पुढील वर्षी निश्चित मार्ग ठरवला जाईल’, असे सांगितले. त्यानंतर तरुणांनी संमती दर्शवली आणि तेथून निघून गेले. (Muslim)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.