SIR Notice : निवडणूक आयोगाकडून लालकृष्ण अडवाणी, एस. जयशंकर अन् निवडणूक आयुक्तांनाच नोटीस; नेमकं कारण काय?

SIR Notice : निवडणूक आयोगाकडून लालकृष्ण अडवाणी, एस. जयशंकर अन् निवडणूक आयुक्तांनाच नोटीस; नेमकं कारण काय?

9
SIR Notice
SIR Notice

SIR Notice : सध्या देशभरात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील पात्रतेची पडताळणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेदरम्यान अनेक दिग्गज नेत्यांनाही निवडणूक आयोगाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, निवडणूक आयुक्त एस.एस. संधू आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एसआयआरची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याआधी शनिवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही नोटीस बजावण्यात आली होती.

कपिल सिब्बल, मनू सिंघवी अन् मिस्री यांचाही समावेश

दरम्यान, या यादीत कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचाही समावेश आहे. या नोटीसच्या यादीनुसार, निवडणूक आयुक्त एस.एस. संधू यांना मतदार नोंदीमधील त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये तफावत आढळल्यामुळे नोटीस बजावण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच या मतदार यादी पडताळणी मोहिमेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या यादीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या पत्नी यांचीही नावे आहेत. दरम्यान, नावांमध्ये किंवा नावांच्या स्पेलिंगमध्ये विसंगती आढळणे अशा कारणांमुळे या नोटिसांच्या यादीत सत्ताधारी आणि अनेक बड्या व्यक्तींचा समावेश आहे.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता, अरविंद केजरीवाल यांनाही नोटिसा

राजधानी दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील पात्रतेची पडताळणी करण्यासाठी सुमारे ३३ लाख मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुमार सचदेवा यांच्यासारख्या प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून समोर आले.

हेही पाहा –
https://youtu.be/WMfjMkEdkLc

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.