Local Train : गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वेच्या २२ विशेष लोकल; जाणून घ्या वेळापत्रक

विसर्जनाच्या रात्री मोठ्या प्रमाणावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन या विशेष लोकल सोडण्यात येणार असून, भाविकांनी या लोकल सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

4
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान रात्री एकूण २२ विशेष उपनगरीय लोकल (Local Train) चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मुख्य मार्गावर सीएसएमटी कल्याण व ठाणेदरम्यान १८ विशेष लोकल, तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री हार्बर मार्गावर सीएसएमटी पनवेलदरम्यान चार विशेष लोकल  (Local Train)  धावणार आहेत. मुख्य मार्गावरील विशेष लोकल २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान मध्यरात्री चालवण्यात येणार असून, या लोकल सीएसएमटी, कल्याण आणि ठाणे दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. हार्बर मार्गावरील चार विशेष लोकल केवळ अनंत चतुर्दशीनिमित्त २६ सप्टेंबर रोजी रात्री सीएसएमटी-पनवेलदरम्यान धावतील.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी- कल्याण विशेष लोकल  (Local Train)  सीएसएमटीहून मध्यरात्री १.४० वाजता सुटेल आणि कल्याणला मध्यरात्री ३.१० वाजता पोहोचेल. सीएसएमटी-ठाणे विशेष लोकल  (Local Train)  सीएसएमटीहून मध्यरात्री २.३० वाजता सुटेल आणि मध्यरात्री ३.३० वाजता ठाण्याला पोहोचेल. सीएसएमटी-कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून मध्यरात्री ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याणमध्ये पहाटे ४.५५ वाजता पोहोचेल.
कल्याण-सीएसएमटी विशेष लोकल  (Local Train)  कल्याणहून मध्यरात्री १२.०५ वाजता सुटेल आणि मध्यरात्री १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे-सीएसएमटी विशेष लोकल  (Local Train)   ठाण्याहून मध्यरात्री १ वाजता सुटेल आणि मध्यरात्री २ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे सीएसएमटी विशेष लोकल ठाण्याहून मध्यरात्री २ वाजता सुटेल आणि मध्यरात्री ३ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. विसर्जनाच्या रात्री मोठ्या प्रमाणावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन या विशेष लोकल सोडण्यात येणार असून, भाविकांनी या लोकल सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री हार्बर मार्गावरून चार विशेष लोकल

अनंत चतुर्दशी निमित्ताने, हार्बर मार्गावरून सीएसएमटीवरून मध्यरात्री १.३० वाजता विशेष लोकल  (Local Train)  सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री २.५० वाजता पोहोचेल. सीएसएमटीहून मध्यरात्री २.४५ वाजता लोकल सुटेल आणि पनवेलला पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल. पनवेलहून मध्यरात्री १ वाजता विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री २.२० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. पनवेलवरून मध्यरात्री १.४५ वाजता लोकल सुटून सीएसएमटीला मध्यरात्री ३.०५ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.