UPI Charges : १५ ऑक्टोबरपासून युपीआयचे नवे नियम; पेट्रोल, रेल्वे तिकिटांवर नेमकं किती शुल्क?

UPI Charges : एमडीआर हा पैसे स्वीकारणाऱ्याने भरायचा आहे. 

15
UPI Charges : १५ ऑक्टोबरपासून युपीआयचे नवे नियम; पेट्रोल, रेल्वे तिकिटांवर नेमकं किती शुल्क?
  • ऋजुता लुकतुके

UPI Charges           यूपीआय वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १५ ऑक्टोबर २०२६पासून युपीआय व्यवहारांच्या शुल्करचनेत बदल होणार आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक युपीआय व्यवहारासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागतील. नव्या व्यवस्थेत २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निवडक व्यापारी व्यवहारांवर व्यापारी सवलत दर म्हणजेच एमडीआर लागू होणार आहे. ग्राहकांकडून हे शुल्क थेट वसूल करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (UPI Charges)

नव्या नियमांनुसार पेट्रोल-डिझेल, रेल्वे तिकीट, दूरसंचार सेवा, विमा आणि कृषी निविष्ठा या क्षेत्रांतील २,००० रुपयांपेक्षा जास्त युपीआय व्यवहारांवर प्रतिव्यवहार ५ रुपये इतका निश्चित एमडीआर आकारला जाईल. उदाहरणार्थ, एखाद्याने यूपीआयद्वारे ३,०००चे रेल्वे तिकीट खरेदी केले, तर त्या व्यवहारावर रुपये ५ इतका एमडीआर लागू होईल. मात्र ग्राहकाने तिकिटासाठी ३,००० रुपयेच द्यायचे आहेत; अतिरिक्त ५ रुपये ग्राहकाकडून घेण्याची तरतूद नाही. (UPI Charges)

(हेही वाचा – Gold Rate today India : सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; खरेदीपूर्वी जाणून घ्या 22, 24 कॅरेटचा ताजा भाव)

या पाच क्षेत्रांव्यतिरिक्त इतर व्यापारी व्यवहारांमध्ये २,०००पेक्षा जास्त रकमेवर ०.४ टक्के एमडीआर लागू होईल. मात्र ७५,००० किंवा त्यापेक्षा जास्त व्यवहारांसाठी हे शुल्क कमाल ३०० रुपयांपर्यंत मर्यादित असेल. त्यामुळे ५,०००च्या व्यवहारावर २० आणि ५०,०००च्या व्यवहारावर १२०० एमडीआर लागू होऊ शकतो. (UPI Charges)

महत्त्वाची बाब म्हणजे व्यक्ती-व्यक्तीमधील युपीआय व्यवहारांवर कोणताही एमडीआर लागू होणार नाही. तसेच २,०००पर्यंतचे व्यापारी व्यवहार विनाशुल्क राहतील. दरमहा युपीआय क्यूआरद्वारे १ लाखांपर्यंत व्यवहार स्वीकारणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांसाठीही शून्य एमडीआरची व्यवस्था कायम राहणार आहे. सरकारच्या माहितीनुसार, त्यामुळे सुमारे ९६ टक्के व्यापारी युपीआय व्यवहारांवर या बदलाचा परिणाम होणार नाही. (UPI Charges)

(हेही वाचा – India vs Australia U19 : भारतीय १९ वर्षांखालील संघाचा ऑस्ट्रेलियावर ७ धावांनी विजय)

म्हणजेच, यूपीआय बंद किंवा सर्वसामान्यांसाठी महाग होणार असा या बदलाचा अर्थ नाही. मोठ्या रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांमध्ये डिजिटल पेमेंटच्या खर्चाची विभागणी करण्यासाठी नवी शुल्करचना आणली जात आहे. ग्राहकांसाठी यूपीआयचा दैनंदिन वापर मात्र पूर्वीप्रमाणेच विनाशुल्क राहणार आहे. (UPI Charges)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.