Pune Accident : पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात; नवले पुलाजवळ कंटेनरचे ब्रेक फेल, धडकेत दोघांचा मृत्यू

या अपघातात कंटेनरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

20
Pune Accident
पुण्यातील नवले ब्रीजजवळ भीषण अपघात

Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावर शुक्रवारी 19 सप्टेंबरच्या मध्यरात्री मध्यरात्री भीषण अपघात झााला. कात्रज-देहूरोड बायपासवरील नवले पूल परिसरातील भूमकर पुलावर हा अपघात घडला. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यानंतर त्याने पुढील वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कंटेनरचा ताबा सुटला अन् घात झाला

प्राथमिक माहितीनुसार, कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यानंतर तो भरधाव वेगाने पुढे जात होता. त्यामुळे चालकाला वाहन नियंत्रित करणे कठीण झाले. त्यानंतर कंटेनरने एका ट्रकसह इतर वाहनांना धडक दिली. या धडकेत वाहनांचे मोठे नुकसान झाले. कंटेनरमध्ये असलेल्या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. (Pune Accident)

हेही वाचा: Today Horoscope 19 September 2026 : शनिदेवांच्या कृपेने बदलणार ‘या’ राशींचे नशीब, वाचा सविस्तर

अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे.

अपघातांची मालिका

नवले पूल आणि त्याच्या आसपासचा कात्रज-देहूरोड बायपासचा भाग यापूर्वीही मोठ्या अपघातांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यामुळे या भागात पुन्हा झालेल्या भीषण अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Pune Accident)

नवले पूल परिसरात यापूर्वीही मोठे अपघात झाले आहेत. 13 सप्टेंबरला जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ मध्यरात्री झालेल्या बहुवाहन अपघातात दोन जणांचा मृत्यू, तर 12 जण जखमी झाले होते. त्या घटनेत साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने पुढील ट्रकला धडक दिल्यानंतर दोन्ही वाहने दुसऱ्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या दोन मोटारींना धडकली होती.

हेही वाचा: Pune Ring Road : पुणे अंतर्गत रिंगरोडच्या भूसंपादनाला वेग; ३-४ महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन

पुढील तपास सुरू

सध्याच्या प्राथमिक माहितीनुसार, कंटेनरचे ब्रेक फेल होणे हे अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ब्रेक नेमके का फेल झाले, कंटेनरचा वेग किती होता आणि अपघाताच्या वेळी इतर वाहनांची नेमकी स्थिती काय होती, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जाणार आहे.

अपघातातील मृतांची अधिकृत ओळख, जखमींची अचूक संख्या आणि वाहनांच्या नुकसानीबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.