Delhi Crime : दिल्लीतील स्वरूप नगर परिसरातील 16 वर्षीय मुलीवरील सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी 50 हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज पडताळले आणि त्यात दिससलेल्या संशयास्पद टेम्पोचा माग काढत, पोलिसांनी अखेर तीन अल्पवयीन मुलांसह एकून चार आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी एका 19 वर्षीय आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून, तीन अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले
नेमके काय घडले होते?
13 सप्टेंबरच्या सकाळी स्वरूप नगर पोलिसांना कुशक रोडवरील लाल बॉर्डर परिसरात एका मोकळ्या मैदानात मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. हा मृतदेह जयपाल राणा यांच्या शेताजवळ आढळला होता. पोलिसांच्या क्राइम टीम आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपास करून पुरावे गोळा केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पुढील तपासात मृत व्यक्ती अल्पवयीन मुलगी असल्याचे स्पष्ट झाले. (Delhi Crime)
या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा आरोपींबाबत ठोस माहिती नव्हती. त्यामुळे तपास पथकाने घटनास्थळ आणि आसपासच्या मार्गांवरील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी 50 हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये घटनेच्या आसपासच्या काळात एक संशयित टेम्पो त्या परिसरातून जाताना दिसला. मात्र, अंधारामुळे सुरुवातीला टेम्पोचा नंबर स्पष्ट दिसत नव्हता. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या CCTV फुटेजचा मागोवा घेत पोलिसांनी या टेम्पोचा मार्ग निश्चित केला. त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी करून टेम्पोचा शोध घेण्यात आला. (Delhi Crime)
टेम्पोमुळे लागला सुगावा
पोलिसांनी 15 आणि 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री शोधमोहीम राबवली. या तपासादरम्यान संशयित टेम्पो स्वरूप नगरमधील खड्डा कॉलनी परिसरात उभा असल्याचे आढळले.
पोलिसांनी टेम्पोच्या चालकाची चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित चार जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. चौथ्या आरोपीची ओळख शिवम उर्फ सुदामा अशी करण्यात आली आहे. (Delhi Crime)
मैत्रिणीला भेटण्यासाठी घराबाहेर पडली अन्…
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मुलगी एका परिचिताला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर संबंधित व्यक्तीने आपल्या मित्रांना बोलावल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी मद्यपान केले होते. त्यानंतर मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मुलगी पोलिसांना देऊ शकते, अशी भीती संशयितांना होती. त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक दावा आहे. (Delhi Crime)
मात्र, आरोपींकडून सांगण्यात आलेला घटनाक्रम आणि प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका तपासली जात आहे. फॉरेन्सिक पुरावे आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: IIT Bombay परिसरात विद्यार्थ्याची आत्महत्या; प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन
दोन चाकू, कपडे आणि टेम्पो जप्त
पोलिसांनी या प्रकरणात दोन चाकू जप्त केले आहेत. याशिवाय घटनेच्या वेळी आरोपींनी घातलेले कपडे आणि वापरलेला टेम्पोही ताब्यात घेण्यात आला आहे. (Delhi Crime)
जप्त केलेल्या वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या पुराव्यांच्या आधारे प्रकरणातील घटनाक्रम आणि आरोपींची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तीन अल्पवयीनांसह चार जण ताब्यात
या प्रकरणात पोलिसांनी एका प्रौढ आरोपीसह तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. उपलब्ध वृत्तांनुसार, तीन अल्पवयीन आरोपींचे वय 16 ते 17 वर्षांच्या दरम्यान आहे. (Delhi Crime)
पोलिसांकडून या प्रकरणातील इतर संभाव्य व्यक्तींची भूमिकाही तपासली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर घटनेचा संपूर्ण क्रम आणि प्रत्येक आरोपीची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community

