Pune रासायनिक खत खरेदीसाठी दुकानांवर होणारी गर्दी आणि रांगा कमी करण्यासाठी जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर्स सेल’ (एफएफएस) प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मोबाइल ॲपवरून खताचे आगाऊ बुकिंग करता येणार असून, बुकिंगनंतर मिळणाऱ्या क्यूआर कोड किंवा ई-टोकनच्या आधारे अधिकृत विक्री केंद्रातून खत घेता येणार आहे. (Pune)
(हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi : ‘वयाच्या या टप्प्यावर असं क्वचितच पाहायला मिळतं,’ राशिद खान वैभव सुर्यवंशीवर काय म्हणाला?)
या प्रणालीची प्राथमिक चाचणी पुणे जिल्ह्यातील अष्टापूर (ता. हवेली) येथे केंद्र सरकारच्या पथकाकडून घेण्यात आली होती. त्यानंतर खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला.केंद्र सरकारच्या या प्रणालीची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आणि पिकांच्या नोंदी, उपलब्ध खतसाठा तसेच अधिकृत विक्री केंद्रांची माहिती प्रणालीशी जोडण्यात येणार आहे. (Pune)
(हेही वाचा – Non Congress Third Front : काँग्रेसला वगळून नव्या समीकरणांची चाचपणी? राष्ट्रीय पटलावर हालचालींना अचानक वेग!)
त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या गरजेनुसार खताचे नियोजन करून आगाऊ बुकिंग करता येणार आहे.एफएफएस प्रणालीच्या वापराबाबत शेतकरी, खतविक्रेते तसेच कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. तालुका आणि गावपातळीवर बैठका तसेच प्रशिक्षण आयोजित करून मोबाइल ॲपच्या वापराबाबत माहिती दिली जाणार आहे.या प्रणालीमुळे खतखरेदीचीप्रक्रिया अधिक नियोजित होण्याबरोबरच विक्री केंद्रांवरील गर्दी आणि रांगा कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. (Pune)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

