Asian Games 2026 : जपानमधील आयची-नागोया येथे २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अधिकृत उद्घाटन सोहळा १९ सप्टेंबर रोजी पार पडणार असून, या सोहळ्यात दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील विद्यमान सुवर्णपदकविजेता गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकांच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. टेकबॉलमध्ये भारताची क्विम्सी जोआकिम डिसूझाने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघानेही शानदार विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. भारताने जपानचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी जपानच्या संघाला अवघ्या ५७ धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळ करत केवळ ५ षटकांत २ गडी गमावून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीलाच नेमबाजी, टेकबॉल आणि क्रिकेटमध्ये भारताच्या कामगिरीने लक्ष वेधले असून, आगामी दिवसांत भारतीय खेळाडूंकडून आणखी पदकांची अपेक्षा आहे.
हेही पाहा –
https://youtu.be/QTl0r-YtoV8


